Headlines

राजा कायम पण संरक्षण स्थिती तणावात, भेंडवळच्या घटमांडणीत भाकीत काय? – bhendwal ghat mandani prdiction 2026



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ३५० पेक्ष्या जास्त वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. या पारंपरिक विधीमधून आगामी वर्षाचे पीक-पाणी, पाऊसमान, सामाजिक-राजकीय घडामोडी तसेच नैसर्गिक आपत्तींचे संकेत वर्तवले जातात. पूर्णा नदीकाठी होणाऱ्या या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, बदलत्या हवामानाच्या आणि आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या भाकितांकडे अधिक उत्सुकतेने पाहिले जात आहे. इराण-अमेरिका तणावासारख्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात काही संकेत मिळतात का, याबाबत चर्चाना उधाण आले आहे.परंपरेनुसार, दुसऱ्या दिवशी सूर्योदयावेळी घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील. मात्र ते तणावात राहतील. तर देशाची संरक्षण स्थिती ही कमकुवत राहील संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून समोर आला आहे. शेतकऱ्यांसाठी यंदा पुन्हा अडचणीच वर्ष ठरू शकतो. यंदा सर्व पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. मात्र कापूस तीळ अशा प्रकारची पीक भरपूर होतील व त्यांना भावही मिळेल असा निष्कर्ष भेंडवळच्या गट मांडणीतून आज निघाला आहे. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत