![]()
कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याहीआश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधीलोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यातफारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीयअभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्यानेपाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे” असेआवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातीलयुवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीसएका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावालागेल, असे कुणाला वाटले होते का? काहीकाळापूर्वीपर्यंत दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) देशात फारशी परिचित नव्हती. आजपरिस्थिती अशी आहे की, टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी, युट्यूबर्स आणि मोठे राजकारणी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील साध्या घराचा शोध घेत आहेत. अनेकांनी केवळ ऑनलाइन ट्रेंड म्हणून दुर्लक्ष केलेली ही चळवळ अचानक वर्षातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींपैकी एक ठरली आहे. मात्र, सीजेपीने तात्कालिक लढाई जिंकली असली तरी तिची खरी कसोटी आता सुरू होते. सीजेपीने केवळप्रेशर ग्रुप म्हणूनच राहावे की निवडणुकीच्याराजकारणातही उतरावे? अलीकडेच मी हाच प्रश्नदिपके यांना विचारला. त्यांनी तत्काळ उत्तर दिले,”राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आम्ही विचारहीकेलेला नाही. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणीकरणारी चळवळ म्हणूनच आम्हाला राहायचे आहे.’देशाने यापूर्वीही असेच विधान ऐकले होते . 2011 मध्येअरविंद केजरीवाल वारंवार सांगत होते की,राजकारणात येण्याचा विचार नाही. मात्र, अवघ्या दोनवर्षांत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. प्रत्येक यशस्वीआंदोलनासमोर शेवटी हाच प्रश्न उभा राहतो—नैतिकबळाचे राजकीय शक्तीत रूपांतर कसे करायचे? तेही तीनैतिक विश्वासार्हता गमावल्याशिवाय? ही कोंडी दिपकेअनेकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.कारण त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम केले आहे.त्यामुळे त्यांनी या प्रवासाच्या दोन्ही बाजू जवळूनपाहिल्या आहेत. आघाड्या, तडजोडी आणिसंघटनात्मक बंधने अपरिहार्य असतात. तेव्हा तिचीनैतिक शुचिता टिकवून ठेवणे किती कठीण असते.इतिहास सांगतो की, प्रत्येक यशस्वी राजकीयपरिवर्तनासाठी केवळ जनआक्रोश पुरेसा नसतो.त्यासाठी योग्य वेळ व स्पष्ट सामाजिक आधारआवश्यक असतो. केजरीवाल केवळ भ्रष्टाचारविरोधीलाटेवर स्वार झाले नव्हते. ते भारतातील वाढत्या शहरीमध्यमवर्गाचा आवाज बनले होते. भ्रष्टाचार, निकृष्टसार्वजनिक सेवा आणि सामान्यांच्या प्रश्नांपासूनदुरावलेल्या व्यवस्थेमुळे हा सुशिक्षित वर्ग अस्वस्थझाला होता. हाच वर्ग ‘आप”चा भक्कम सामाजिक पायाठरला. नैतिक संतापामुळे एखाद्या आंदोलनाचा जन्महोऊ शकतो. पण निवडणुकीत तो फार काळ टिकतनाही. त्यामुळेच दिपके यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्नउभा राहतो. सीजेपीचा मुख्य समर्थक वर्ग नेमकाकोणता? वारंवार पेपरफुटीमुळे त्रस्त झालेली जेन-झी?नोकरीसाठी संघर्ष करणारे बेरोजगार पदवीधर? कीभारताच्या विकासप्रवासात आपण मागे पडलो आहोत,असे वाटणारा महत्त्वाकांक्षी निम्न मध्यमवर्ग? याप्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाल्याशिवाय कोणत्याहीआंदोलनाचे निवडणुकीतील राजकीय ताकदीत रूपांतरहोणे अत्यंत कठीण आहे. भारतीय जनता पक्ष आजहीदेशातील सर्वात प्रभावी निवडणूक शक्ती आहे. एकाकेंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे ही निश्चितच मोठीकामगिरी आहे. परंतु भाजपासारख्या मजबूत निवडणूकयंत्रणेला पराभूत करणे ही पूर्ण वेगळी बाब आहे. खरे तरसीजेपीची सर्वात मोठी ताकद याच गोष्टीत आहे की, तीराजकीय पक्ष नाही. या आंदोलनाने जनतेच्या मनातस्थान निर्माण केले. कारण ते पारंपरिक पक्षीयराजकारणाच्या पलीकडे उभे राहिले. त्यांनी युवकांनाआपला रोष व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्धकरून दिले. ही नैतिक विश्वासार्हता मौल्यवान आहे.एकदा ती गमावली तर ती पुन्हा मिळवणे अत्यंत कठीणठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एखादी चळवळ निवडणुकीच्याराजकारणात प्रवेश करते तसा तिचाप्रत्येक निर्णय तडजोडीसारखा वाटूलागतो. एकेकाळी व्यवस्थेला बाहेरूनआव्हान देणारी संघटना हळूहळू त्याचव्यवस्थेचा भाग बनते. कदाचित याचकारणामुळे सीजेपीला दबाव गट म्हणूनचकायम राहायचे असावे.
Source link
राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट''च राहणार राजकारणातही उतरणार?
