Headlines

मॅडमsssमॅडम… रात्रीचे पावणे तीन वाजलेले, विद्यार्थिनी वॉशरूमकडे निघाली, तितक्यात खिडकीजवळ… धुळ्यात गर्ल्स नर्सिंग हॉस्टेलमध्ये खळबळ


धुळे येथील नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर पालकांनी आणि आदिवासी बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रशासनाने तातडीने हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केले असून, सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Dhule Crime
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धुळे : नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. हॉस्टेलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शहरात एकाच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भुमिका मृत विद्यार्थीनीच्या पालकांसह आदिवासी बांधवांनी घेतली होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकल्प अधिकारी चेतन महाले यांनी तात्काळ वार्डनच्या निलंबनाचे आदेश काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, निशा राया वळवी (वय १८.५ वर्षे), रा.अस्तंबा, पो. तलाई ता.धडगाव जि. नंदुरबार ही शांताई एज्युकेशन नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. पिंपळनेर येथील यशोदा नगरातील एका हॉस्टेलमध्ये ती राहत होती. मात्र, काल मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास एका विद्यार्थीनीला जाग आल्यानंतर ती शौचालयाकडे गेली असता तिला निशा वळवी ही शौचालयात खिडकीला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. तिने याबाबत हॉस्टेलमधील मुलींना सांगितल्यानंतर मुली घाबरल्या. त्यांनी तातडीने हॉस्टेलमधील वार्डन व कर्मचाऱ्यांना सदर माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पहाणी केली. त्यानंतर निशाला खाली उतरवून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
Maharashtra TimesDhule News: तुला पोलिस बनलेलं पाहायचंय; स्वप्न पूर्ण करण्यापूर्वीच बहीण गेली, दोन चिमुरड्यांसह महिलेने जीव दिला
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काल सकाळीच मुलीचे पालक सिव्हीलमध्ये दाखल झाले होते. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी भेट देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. यावेळी आदिवासी समाजबांधवांनी सिव्हील हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी प्रकल्प अधिकारी चेतन महाले यांनी हॉस्टेलच्या वॉर्डन विमल जाधव यांना तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान, याप्रकरणी वॉर्डन विमल जाधव यांच्या खबरीवरुन पिंपळनेर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली.
Maharashtra TimesDhule News : दिवाळीसाठी तरुण घरी आला, पण आनंदाचा क्षण दु:खात बदलला; गावात पोहोचताच… कुटुंबाचा टाहो

खिडकीला ओढणीने गळफास

गृहपाल विमल जाधव यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, क्षमतेमुळे वसतिगृहातील २० अतिरिक्त मुलींना भाड्याच्या इमारतीत ठेवण्यात आले होते. काल, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता त्यांनी पाहणी केली होती. आज पहाटे २:५५ वाजता वॉचमन सुनिता रतिलाल पावरा यांनी गृहपाल जाधव यांना फोन करून कळवले की, निशा राया वळवी (वय १८, मूळ रा. अंस्तबा, जि. नंदुरबार) या जी.एन.एम. नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शौचालयाच्या खिडकीला ओढणीने गळफास घेतला आहे.
Maharashtra TimesDhule Monkeypox : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, सौदी अरेबियाहून धुळ्यात आलेला व्यक्ती बाधित
गृहपाल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व अॅम्बुलन्सच्या मदतीने निशाला खाली उतरवून पहाटे ४:२० वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनेने वसतिगृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा इशारा दिला होता पण त्यांची समजूत काढण्यात आली व शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षण किरण बर्गे करीत आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा