Headlines

मानलं भावा! अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतली पण 2015चा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही, काय आहे तो अनब्रेकेबल विक्रम ; जाणून घ्या


Ajinkya Rahane Unbreakable Record : मराठमोळा क्रिकेटपटून अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली आहे. लढवय्या क्रिकेटपटू अशी ओळख मिळवलेल्या अजिंक्यच्य नावावर एक असा रेकॉर्ड जो कोणाही जमी शकलेला नाही. नेमका काय हे जाणून घ्या.

Ajinkya Rahan Record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मराठमोळा क्रिकेटपटू असलेला अजिंक्य आपल्या शांत स्वभावामामुळे कधी कोणत्या वादात अडकला नाही. आपल्या क्लासिकल बॅटिंगमुळे त्याच्याकडे जास्त ताकद नसली तरी टायमिंग मात्र परफेक्ट होता. या टायमिंगच्या जोरावर अजिंक्यने जगातील कित्येक गोलंदाजांना फोडून काढलं. लॉर्ड्स, मेलबर्न डर्बन, वेलिंग्टनसह जगातील अशा अनेक मैदानांवर भारतासाठी तो संकटमोचक ठरला आहे.

माजी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे एकदा मैदानावर आले म्हणजे विरोधी संघाच्या गोलंदाजांची दमछाक झालीच पाहिजे. पुजारा जो सहसा चेंडूला बॅट काही लगेच लावायचा नाही, लाईनमध्ये आला तर तोही बचावात्मक पद्धतीने खेळायचा. अजिंक्य आणि पुजाराची जोडी जमली की भारत आश्वस्त व्हायचा, जर टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर आऊट झाले तरी हे दोघे सावरून घ्यायचे. असे कित्येक सामनेही आहेत जे अजिंक्य आपल्या दमावरून जिंकवून किंवा सामन्यात भारताल कमबॅक करून द्यायचा. पुजारा निवृत्त झाला होता आणि आता अजिंक्य रहाणे यानेही हा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अजिंक्यने २०१५ साली केलेला वर्ल्ड रेकॉर्ड अजूनही कोणत्याचा भारतीय खेळाडूला मोडता आलेला नाही. नेमका काय आहे तो विक्रम जाणून घ्या.
Maharashtra TimesAjinkya Rahane Retirement : तुम्ही मला कधी परकं मानलं नाही! अजिंक्य रहाणे याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक Video शेअर
एका कसोटी सामन्यामध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. अजिंक्य रहाणे याने २०१५ मध्ये श्रीलंकेतील गॅले इथे झालेल्या कसोटी सामन्यात ८ कॅच घेतले होते. आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. एक भारतीय म्हणून हा विक्रम त्याच्याच नावावर आहे. २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम याने भारताविरूद्ध ९ कॅच घेत हा विक्रम मोडला होता पण भारतीय खेळाडूला अशी कामगिरी करता आलेले नाही. के.एल. राहुल याने इंग्लंडमध्ये २०१८ मध्ये सात कॅच पकडले होते, मात्र अजिंक्य याचे ८ कॅच असल्याने त्याचा हा विक्रम मोडू शकला नसता. अजिंक्य एक उत्कृष्ट फिल्डरही होता, अनेक आचंबित करणारे कॅचही आपल्या करियरमध्ये पकडल आहेत.
Maharashtra TimesSakshi Chaudhary Boxing : शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी, बॉक्सर साक्षीनं पदक पक्कं करत रचला इतिहास, एका टर्निंग पॉइंटने बदललं आयुष्य
दरम्यान, अजिंक्य रहाणे यामने भारतीय क्रिकेटमध्ये २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताकडून पदार्पण केले होते. इंग्लंडविरूद्धच वनडेमध्येही त्याने भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर २ वर्षांनी म्हणजेच २०१३ ला कसोटीमध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले. गेले काही दिवस तो संघात येण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याला शेवटपर्यंत ते काही जमले नाही. अखेर त्याने आज व्हिडीओ करत निवृत्ती जाहीर केली.