Headlines

मनोज बाजपेयी झाला ‘पुणेकर’, या निसर्गरम्य ठिकाणी कोट्यवधींची जमीन खरेदी


मुंबई: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सध्या रिअल इंडस्ट्रेटमधील खरेदी विक्रीमुळे चर्चेत आहेत. आता अभिनेते मनोज बाजपेयीही मोठ्या रिअल इस्टेट डीलमुळे चर्चेत आलेत. त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात एक मोठा व्यवहार केला आहे. रक्षाबंधन सणाच्या काही दिवस आधीच त्यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कोट्यवधींची जमीन खरेदी केली आहे.या नव्या व्यवहारानं त्यांच्या एकूण नेट वर्थमध्ये चांगलीच भर पडली आहे.

पुण्यातील मुळशी तालुक्यात जमीन खरेदी

काही रिपोर्ट्सनुसार मनोज बाजपेयी यांनी ही शेतजमीन पुण्यातील मुळशी तालुक्यातील ‘तैलबैला’ या निसर्गरम्य गावात खरेदी केली आहे. लोणावळ्याजवळ असलेला हा परिसर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. विमलचंद खिमराज जैन यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. हा पूर्ण व्यवहार १.३७ कोटी रुपयांमध्ये झाल्याचं म्हटलं जातंय. ४.४५ एकर इतकं या जमिनीचं क्षेत्रफळ असून २५ ऑगस्ट २०२६ नोंदणी झाली आहे. ३०,००० नोंदणी शुल्कही भरण्यात आलंय.

Maharashtra TimesRaksha Bandhan:काही नाती रक्ताची, काही मनाची, प्रत्येक कथेत भाऊ-बहिणीच्या नात्याची ऊब, हे सिनेमे आज पाहाच
मनोज बाजपेयी केवळ अभिनयातच नव्हे, तर रिअल इस्टेट गुंतवणुकीतही आघाडीवर आहेत. यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी मुंबईतील ओशिवरा भागात ‘सिग्नेचर बिल्डिंग’मध्ये तब्बल ३२ कोटी रुपयांची ४ कमर्शियल ऑफिस युनिट्स खरेदी केली होती. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि काजोल यांच्यासारख्या बड्या कलाकारांच्या रांगेत बसत त्यांनी व्यावसायिक मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली होती.

मुळशी-लोणावळा परिसराला पसंती का?

मुंबई आणि पुण्यापासून जवळ असल्यामुळं लोणावळा-मुळशी पट्टा सेकंड होम, वीकेंड रिट्रीट आणि शेतजमिनीच्या गुंतवणुकीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे. शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी मनोज बाजपेयी यांनीही या परिसराची निवड केली असल्याचे दिसतं.

‘द फॅमिली मॅन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या कलाकृतींमधून प्रेक्षकांची मने जिंकणारे मनोज बाजपेयी यांच्या या नव्या गुंतवणुकीची सध्या चित्रपटसृष्टीत आणि रिअल इस्टेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Maharashtra TimesOrry Slams Amrita Singh: ‘प्रचंड मानसिक त्रास, नरकयातना दिल्या, वाईट लोकांसोबत वाईटच घडतं’, ऑरीचा अमृता सिंगवर निशाणा, इंडस्ट्रीत खळबळ

मनोज बायपेयींबद्दल बोलायचं झालं तर, बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेलवा या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांच्या जन्म झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मनोज यांनी दिल्ली गाठली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी चार वेळा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी त्यांना नकार मिळाला. या नकारामुळे खचून न जाता त्यांनी रंगभूमीवर (थिएटर) काम करणं सुरू ठेवलं.

१९९४ मध्ये ‘द्रोहकाल’ आणि ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटांतून त्यांनी पदार्पण केलं. मात्र, १९९८ मध्ये आलेल्या रामगोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘भिखू म्हात्रे’ या भूमिकेनं मनोज बाजपेयींचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. “मुंबई का किंग कोण? भिखू म्हात्रे!” हा संवाद आणि त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत