Headlines

दोन मुली अमेरिकेत सोडून नेपाळला गेलेले भारतीय आई-वडील बेपत्ता; मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत


Nepal Flood Update: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर भारतीय वंशाचे दोघे बेपत्ता आहे. दीपक आणि मधू अहुजा हे जोडपे कैलास मानसरोवर येथे तीर्थयात्रा करण्यासाठी गेले होते. त्यांना दोन मुली असून ते अमेरिकेत आहेत. या दोघानींही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळ, चीन आणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून दोघीही आपल्या आई वडिलाच्या एका कॉलच्या प्रतीक्षेत आहे.

nepal flash flood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नेपाळ: नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरात ३५० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला तर १ हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांपैकी २८८ भारताचे नागरिक आहेत. त्यातलंच एक जोडपं दीपक आणि मधू अहुजा यांचा शोध त्यांच्या टेक्सस येथे राहणाऱ्या दोन मुली घेत आहेत. धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या आई-वडिलांचा कधीही फोन येऊ शकतो अशी त्यांना अपेक्षा आहे.

भारतीय वंशाचे दीपक आणि मधू अहुजा अमेरिकेतल्या टेक्सस येथून कैलास मानसरोवर तीर्थयात्रेला गेले होते. निमित्त होतं दीपक यांचा ६० वा वाढदिवस. मुलींनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, इशा फाऊंडेशनने आयोजित केलेली ही नेपाळ यात्रा जवळपास संपली होती. तसेच ते पुन्हा टेक्ससच्या दिशेने निघण्याच्या तयारीत होते. मात्र नेपाळ आणि तिबेट यांच्यामधील जिरोंग पोर्ट सीमा ओलांडताना अचानक महापूर आला. तेव्हापासून या दोघांचा काहीच पत्ता नाही.

एका कॉलची वाट बघत आहे मुली

अहुजा कुटुंबीयांनी महापुराची बातमी बघितल्यानांतर दीपक आणि मधू अहुजाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना उत्तर मिळालं नाही. इशा फाउंडेशनने कुटुंबियांना एक ईमेल केला होता. यामध्ये गीरोंग पोर्टया सीमेवर इमिग्रेशन कार्यालयात असलेल्या लोकांना महापुराचा फटका बसला अशी माहिती देण्यात आली. महापूर येण्यापूर्वी दीपक आणि मधु यांनी आपल्या एका मुलीसोबत फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी आई वडिलांनी आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत असे सांगितले होते. आपले आई-वडीलही त्यातच होते का, ते सुरक्षित असतील का? याचा पत्ता लावणे सध्या अशक्य होत आहे. आता तेच आपण सुखरूप असल्याची माहिती देण्यासाठी फोन करतील अशी आशा मधुच्या मुलींना आहे.

आम्हाला ते घरी पाहिजे

जेव्हा ते डल्लासला आले तेव्हाच मी त्यांना भेटणार होते. आम्ही या आठवड्याच्या शेवटी सोबत वेळ घालवणार होतो. दोघींनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाशी आणि US राज्य विभागाला संपर्क केला असून भारत, नेपाळ आणि चीनच्या अमेरिकन दूतावासाशी संपर्क केला आहे. आम्ही आमच्या आई वडिलांवर भरपूर प्रेम करतो आणि आम्हाला ते घरी परतलेले पाहिजे अशी भावनिक आर्तहाक त्यांनी केली आहे.

Maharashtra TimesGlacial breach risk : फुटबॉलची 280 मैदानं बुडतील इतकं पाणी, नेपाळजवळ तलाव फुटण्याची भीती, चीनकडून इशारा, भारतीय सीमेपर्यंतच्या वस्त्यांनाही धोका

आध्यात्मिक गुरु सदगुरु जग्गी वासुदेव यांची विनंती

आध्यात्मिक गुरु सदगुरु जग्गी वासुदेव म्हणाले, नेपाळ-तिबेट सीमेवर महापूर धडकल्यानंतर एका समूहातील ८० नागरिक बेपत्ता आहेत. जिरोंग येथे आपापल्या बचाव पथकाला पाठवण्यात यावे जेणेकरून बेपत्ता असलेल्या नागरिकांना शोधण्यात मदत होईल, अशी विनंती देखील त्यांनी भारत आणि चिनी दूतावासाला केली आहे.

२८८ भारतीय अद्याप संपर्काच्या बाहेर

या महापुरात जवळपास ३५९ जणांचा मृत्यू झाला तर २८८ भारतीय अद्याप संपर्काच्या बाहेर आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार १०० हुन अधिक नागरिक नेपाळ आणि तिबेट येथे बेपत्ता आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, २१ बेपत्ता भारतीय सापडले असून त्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. मात्र अजूनही चीनच्या बाजूने अनेक भारतीय अडकलेले आहे. ९५ जण हे दार्चेनमध्ये अडकले, तर काही जिलॉन्ग शहर आणि झुतुलफुकमध्ये अडकलेले आहे.

नेपाळचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल म्हणाले, १५०० पेक्षा जास्त नागरिक नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या महापुरात अडकलेले आहे. त्यात जवळपास ८०० विदेशी नागरिक आहे. या महापुराचा सगळ्यात जास्त फटका तिमुरे गाव आणि चीनच्या ‘गीरोंग पोर्ट’ ला बसला आहे. हा भाग ट्रेकर्स आणि तीर्थ यात्रेकरूंसाठी मुख्य रस्ता असल्याने अनेक प्रवासी तिथे अडकले आहेत. तिथे देखील अनेक लोक बेपत्ता आहेत असं चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा