मुंबई:बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांसोबतच त्याच्या मदतकार्यासाठीही ओळखला जातो.कुटुंबिय असोत किंवा मित्र-मैत्रिणी, किंवा एखादा चाहता…गरज असले त्याच्या मदतीला सलमान खान धावून जात असतो. नुकताच याचा आणखी एक प्रत्यय आला. सलमान खानचा अनेक वर्षांपासून बॉडी डबल म्हणून काम करणाऱ्या परवेझ काझीची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याच्यावर हृदयाशी संबंधित एक लहान शस्त्रक्रिया करावी लागली.
बॉडी डबल परवेझ काझीच्या या कठीण काळात सलमान खाननं स्वतः पुढाकार घेत त्याच्या उपचारांची आणि वैद्यकीय खर्चाची पूर्ण जबाबदारी उचलली आहे.
तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला परवेझ काझीला घरी असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं डॉक्टरांनी त्याच्यावर एक लहान हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला परवेझला शूटिंगदरम्यान हार्ट अटॅक आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, परवेझचे मॅनेजर पीयुष यांनी या अफवांचे खंडन केलं. पीयुष यांनी स्पष्ट केलं की, परवेझला हार्ट अटॅक आला नव्हता, तर नियमित तपासणीनंतर डॉक्टरांनी लहान शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सलमान सर परवेझला आपल्या लहान भावासारखे मानतात. या आजारपणाची माहिती मिळताच सलमान सर त्वरित मदतीला धावले आणि उपचारादरम्यान आमच्यासोबत रुग्णालयात उपस्थित राहिले.
कोण आहे परवेझ काझी ?
परवेझ काझी हा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचा मुख्य बॉडी डबल म्हणून काम करत आहे. त्यानं सलमानच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट आणि बॉडी डबलची दृश्ये साकारली आहेत. प्रेम रतन धन पायो, सुलतान ,टायगर जिंदा है, रेस ३ , भारत ,दबंग ३ , राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई . अशा सिनेमांत त्यानं सलमानसाठी काम केलंय. तर तो सोशल मीडियावरही कमालीचा लोकप्रिय आहे.
Kangana Ranaut On Kriti Sanon : ‘अंतर्वस्त्र घालून कोण भावाला राखी बांधतं’, क्रितीच्या रक्षाबंधन स्पेशल जाहिरातीतील लुकवर कंगना रणौतची जोरदार टीका सध्या सलमान खान दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या आगामी ‘मॉन्स्टर’ या पॅन-इंडिया ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. फिल्मसिटीमध्ये यासाठी मोठा सेट उभारण्यात आला असून एका कोरियन स्टंट टीमच्या मदतीनं ॲक्शन सीन्स डिझाइन केले जात आहेत. परवेझच्या शस्त्रक्रियेमुळं स्टंट शेड्युलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं थोडे बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याची प्रकृती आता उत्तम आहे. तो लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा एकदा शूटिंगच्या सेटवर परतणार आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा