Headlines

Nandurbar MPSC Paper Leak Scam; Teacher Amrut Patil Exposed By Lover



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदभरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात अनेक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, त्यांना यापूर्वी राज्यस्तर

.

या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाची सुरुवात एका नियोजित कटातून झाली. अमृत पाटील यांनी कौटिल्य अकादमीशी संबंधित असलेल्या प्रवीण पाटील या दलालाच्या मदतीने हा कट रचला. 22 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेच्या दोन दिवस आधीच त्यांनी आपली मुलगी ऋतुजा हिच्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवली होती. पैशांच्या आणि वशिल्याच्या जोरावर मुलीला अधिकारी बनवण्याचा हा थेट प्रयत्न होता.

पेपरफुटीला मिळालेला ‘लव्ह स्टोरी’चा अँगल

प्रश्नपत्रिका हाती आल्यावर ऋतुजाने प्रेमापोटी ती तिचा बॉयफ्रेंड आणि एमपीएससीचीच तयारी करणारा विद्यार्थी गौरव पाटील उर्फ लोकेश याला दिली. जेव्हा परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा ऋतुजा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. मात्र तिचा प्रियकर गौरव या परीक्षेत अपात्र ठरला. इथूनच या प्रकरणाला एका नाट्यमय ‘लव्ह-हेट स्टोरी’चे वळण मिळाले.

ब्रेकअपची भीती आणि तक्रारीचे नाट्य

निकालानंतर ऋतुजा आता अधिकारी होईल आणि ती कायमची आपल्यापासून दूर निघून जाईल, ही भीती गौरवला सतावू लागली. त्यातच तिने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गौरवने थेट एमपीएससीकडे ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ‘मी अपात्र ठरल्यामुळे मुद्दाम हा बनाव रचला होता’ असा ई-मेल करून त्याने आपली तक्रार मागे घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीची चक्रे वेगाने फिरवली होती.

पोलिसी कारवाई आणि विद्यार्थ्यांचा वाढता संताप

या प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करत तक्रारदार गौरव पाटील आणि मुख्य आरोपी शिक्षक अमृत पाटील यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केली आहे. ऋतुजा पाटील हिला अद्याप अटक झाली नसून पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. टीईटी (TET), नीट (NEET) आणि आता एमपीएससीसारख्या (MPSC) महत्त्वाच्या परीक्षांमध्ये सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या सत्रांमुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला असून, आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भातील या देखील बातम्या वाचा..

‘लव्हस्टोरी’मुळे MPSCचा पेपर फुटला!:प्रियकराने आयोगातील कर्मचाऱ्याशी हातमिळवणी केल्याचा संशय, एकाला पेपर मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातून पेपरफुटी झाल्याची माहिती तपासातील सूत्रांकडून समोर आली आहे. एका प्रियकराने एमपीएससीमधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फुटलेला प्रश्नसंच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसून एका उमेदवाराला त्याचा थेट फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. वाचा सविस्तर

पेपरफुटीवरून आमदार रोहित पवार यांचा आक्रमक इशारा:MPSC अध्यक्ष हे मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, नाहीतर 1 सप्टेंबरला तीव्र आंदोलन

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात एका उमेदवाराला प्रश्नसंचाचा आधीच लाभ मिळाल्याचे निष्पन्न झाल्याने आयोगाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. वाचा सविस्तर

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई:तीन अधिकारी आणि क्लासचालकासह 6 जण अटकेत, 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये खासगी क्लासचालक, संबंधित उमेदवाराच्या नातेवाईकांसह अन्य व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचा सविस्तर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत