Aryavir Sehwag Video : भारताचा ‘वाघ’म्हणजेच वीरेंद्र सेहवाग ज्याची प्रत्येक विरोधी गोलंदाजांना धास्ती असायची. आता तो निवृत्त झाला असला तरी त्याचा मुलगा आता मैदानात खेळतोय. पठ्ठ्याने वडिलांसारखाच सेम टू सेम बॅकफूट पंच खेळलाय. व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aryavir Sehwag Four Same To Same Shor(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेम टू सेम आपल्या वडिलांसारखाचा त्याने बॅकफुच पंच खेळला असून तो पाहताना सर्वांना वीरूच्या बॅकफुट पंचचा आठवण झाली. आर्यवीर सेहवागचा हा व्हिडीओ कोणत्या मॅचमधील आणि कधी खेळला हे जाणून घ्या.
दिल्ली प्रीमियर लीग २०२६ मधील ३५ वा सामना वेस्ट दिल्ली लायन्स आणि न्यू दिल्ली टायगर्समध्ये पार पडला. हा सामना अरूण जेटली स्टेडियमध्ये होता, या सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स संघाने ६ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये नीतीश राणा आणि आयुष डोसेजा यांनी अर्धशतकी खेळी केल्या पण सर्वत्र चर्चा ही सेहवागच्या सुपुत्राची झाली. आर्यवीर याने १४ चेंडूत २२ धावा करताना यामध्ये ४ चौकार लगावले. सेहवागचा मुलगा आर्यवीर हा सुद्धा ओपनिंगलाच खेळायला येतो.
IND vs SL 2nd Test : विजयानंतरही दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात दोन मोठे बदल, कोणाची होणार एन्ट्री? प्लेइंग 11 जाणून घ्या या सामन्यात न्यू दिल्ली टायगर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतानास १९५-६ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून आर्यवीर आणि कृष यादव ह ओपनिंगला आले. पहिल्या विकेटसाठी ४१ धावा केल्या होत्या. आर्यवीर याने वेस्ट दिल्लीला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. पठ्ठ्याने २२ धावा करताना त्यातील १६ धाव या चौकारांनीच केल्या होत्या. त्यानंतर नीतीश राणाने २३ चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी केली. कॅप्टन आयुष डोसेजाने ३३ चेंडूत ६४ धावा करताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांच्या आक्रमक खेळीपेक्षा सर्वात जास्त सेहवागच्या मुलाची होत आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा