Benefits of rubbing potato on freezer walls fact check : घरातील फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाच्या उपकरणांपैकी एक आहे. भाज्या, फळे, दूध, आईस्क्रीम किंवा इतर खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. मात्र फ्रीझरमध्ये सतत बर्फ साचणे ही अनेक घरांमधील कॉमन समस्या आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, फ्रीझरचा वापर सतत सुरू असतो. पण अनेकदा त्यात बर्फाचा जाड थर साचतो, ज्यामुळे आत ठेवलेले पदार्थ काढणे कठीण होते. हा बर्फ वेळेवर साफ केला नाही तर तो आणखी घट्ट होतो आणि साफसफाई एक किचकट आणि वेळखाऊ काम बनते. अशाच समस्येवर सोशल मीडियावर एक भन्नाट आणि विचित्र ट्रिक व्हायरल होत आहे. फ्रीझरमध्ये कच्चा बटाटा घासणे. हा उपाय पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं, पण दावा असा आहे की यामुळे बर्फ साचणं कमी होतं आणि साफसफाई सोपी होते.

अशाच समस्येवर सोशल मीडियावर एक भन्नाट आणि विचित्र ट्रिक व्हायरल होत आहे. फ्रीझरमध्ये कच्चा बटाटा घासणे. हा उपाय पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं, पण दावा असा आहे की यामुळे बर्फ साचणं कमी होतं आणि साफसफाई सोपी होते.या ट्रिकनुसार, बटाट्यातील नैसर्गिक स्टार्च फ्रीझरच्या पृष्ठभागावर एक पातळ थर तयार करतो, ज्यामुळे ओलावा थेट पृष्ठभागावर चिकटत नाही आणि बर्फाचा थर कमी होतो असा समज आहे.
त्यामुळे काही लोक साफसफाईनंतर फ्रीझरच्या भिंतींवर बटाटा घासून हा “protective layer” तयार करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय बटाट्यामुळे पृष्ठभाग थोडा स्मुद होतो, त्यामुळे भांडी किंवा ट्रे चिकटण्याची शक्यता कमी होते असाही दावा केला जातो. मात्र दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनेक तज्ज्ञांच्या मते हा उपाय पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही. फ्रीझरमध्ये निर्माण होणारा बर्फ मुख्यतः ओलावा आणि तापमानातील बदलांमुळे तयार होतो, त्यामुळे फक्त बटाटा घासल्याने ही मूलभूत समस्या पूर्णपणे दूर होते असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. (फोटो सौजन्य :- @vardanpakwan, @iStock)
लोक बटाटा का घासात आहे
बटाटा घासण्याची ट्रिक नेमकी काय सांगते यानुसार, कच्चा बटाटा फ्रीझरच्या आतील भिंतींवर नीटपणे घासला जातो. असे केल्याने बटाट्यातील रस आणि स्टार्च मिळून पृष्ठभागावर एक पातळ थर तयार होतो असे मानले जाते. हा थर फ्रीझरच्या भिंतींना काही प्रमाणात कोटिंग देतो, ज्यामुळे ओलावा थेट पृष्ठभागावर चिकटत नाही आणि त्यामुळे बर्फाचा थर कमी होतो असा दावा केला जातो.
फ्रीझरमध्ये बर्फ साचण्याची कारणे
फ्रीझरमध्ये बर्फ साचण्यामागे काही साधी पण महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे फ्रीझरच्या आत शिरणारा ओलावा (moisture). जेव्हा आपण फ्रीझरचा दरवाजा वारंवार उघडतो, तेव्हा बाहेरची उष्ण आणि ओलसर हवा आत प्रवेश करते. त्याचप्रमाणे गरम अन्न थेट फ्रीझरमध्ये ठेवणे, दरवाजाचा रबर सील नीट बंद न होणे किंवा आत-बाहेर हवा सतत फिरणे यामुळेही ओलावा वाढतो. हा ओलावा थंड वातावरणात पोहोचताच गोठतो आणि हळूहळू बर्फाचा थर तयार होतो
विज्ञान काय सांगते
पण विज्ञान काय सांगतं हे समजून घेतलं तर ही ट्रिक पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. बटाट्यात स्टार्च (starch) असतो, पण तो फ्रीझरच्या अत्यंत कमी तापमानात दीर्घकाळ टिकणारा किंवा कायमस्वरूपी protective coating तयार करू शकत नाही. इतक्या थंड वातावरणात हा थर लवकरच गोठतो, खराब होतो किंवा प्रभाव कमी होतो. त्यामुळे ओलावा थांबवण्यासाठी तो प्रभावी ठरतो असे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. आजपर्यंत कोणत्याही मान्यताप्राप्त वैज्ञानिक अभ्यासाने या ट्रिकला पूर्णपणे समर्थन दिलेले नाही.
फ्रीझरमध्ये बर्फ का साचतो याची कारणे आणि उपाय
फ्रीझरमध्ये कच्चा बटाटा घासल्याने काय होते?
फ्रीझरचा खरा वास आणि बर्फ कमी करण्यासाठी काही सोपे आणि साधा उपाय सर्वात प्रभावी ठरतात. बेकिंग सोडा (baking soda) फ्रीझरमध्ये ठेवला किंवा वापरला तर तो हळूहळू वास शोषून घेतो आणि फ्रीझरला fresh ठेवण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे व्हिनेगर किंवा लिंबू हे नैसर्गिक disinfectant म्हणून काम करतात आणि पृष्ठभागावरील दुर्गंधी तसेच जंतू कमी करण्यास मदत करतात.
हा उपाय काम करतो का?
फ्रीझरमध्ये बटाटा घासण्याची ट्रिक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली असली तरी ती कोणतीही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध (scientifically proven) उपाय नाही. या ट्रेंड मोठ्या प्रमाणावर पसरला आणि अनेक लोकांनी तो घरगुती प्रयोग म्हणून ट्राय केला. मात्र वास्तवात फ्रीझरची समस्या सोडवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमित साफसफाई, योग्य देखभाल (maintenance) आणि अन्नाची योग्य साठवणूक.

