Headlines

प्रेम झालं, नातं बहरलं, लग्नापर्यंत गेलेला विषय पण टीम इंडियाच्या ५ क्रिकेटर्सची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, पाहा कोण?


Indian Cricketers Love Stories : कधी प्रेमाची चर्चा, कधी लग्नाच्या बातम्या आणि मग अचानक सगळं संपलं… भारतीय क्रिकेटमधील या प्रसिद्ध चेहऱ्यांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडलं, जे आजही चर्चेत आहे?

Indian Cricketers Love Stories
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतामध्ये मैदानावर खेळणारे क्रिकेटर्स चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. यातील काही क्रिकेटर्सच्या आयुष्यात प्रेम आले, नातं बहरलं, एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या. पण प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट गोड झाला नाही. काही नाती कुटुंबीयांच्या विरोधामुळे थांबली, तर काहींचा प्रवास अचानक थांबला. एका कहाणीने तर क्रिकेटपटूच्या आयुष्यावरच मोठा परिणाम केला. अशाच चर्चेत राहिलेल्या क्रिकेटर्सच्या प्रेमकहाण्या जाणून घेऊयात.

महेंद्रसिंग धोनी आणि प्रियांका झा

महेंद्रसिंग धोनी जेव्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत होता, तेव्हा प्रियांका झा नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती. ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात त्यांच्या कथित नात्याचा संदर्भ देण्यात आला आहे. २००२ मध्ये एका कार अपघातात प्रियांकाचे दुर्दैवी निधन झाले, असेही या सिनेमात सांगण्यात आले. या अनपेक्षित धक्क्यातून सावरल्यानंतर धोनीने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आणि पुढे देशासाठी इतिहास रचला.

Maharashtra TimesIND vs PAK : 5 सप्टेंबरला नेमकं काय होणार? भारत-पाक सामन्याआधी कोच अमोल मुझुमदारांचं मौन, मोठा निर्णय बाकी

रवी शास्त्री आणि अमृता सिंग

८० च्या दशकात रवी शास्त्री आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघांनी एका सुप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरसाठी एकत्र फोटोशूटही केले होते आणि त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांच्याही करिअर आणि वैयक्तिक अपेक्षांमधील मतभेदांमुळे हे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.

सौरव गांगुली आणि नगमा

२०००-०१ च्या दरम्यान, तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली आणि अभिनेत्री नगमा यांच्या कथित नात्याच्या बातम्यांनी मीडियात खळबळ उडवली होती. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघे दक्षिण भारतातील एका मंदिरात एकत्र दिसले होते. मात्र, गांगुली आधीच विवाहित असल्याने या कथित नात्यावर दोन्ही बाजूंनी कधीही थेट भाष्य केले गेले नाही आणि कालांतराने या चर्चा थांबल्या.

Maharashtra TimesTeam India Fitness Test : श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शन मोडमध्ये, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट, कोण राहिलं गैरहजर?

युवराज सिंग आणि किम शर्मा

२००० च्या दशकाच्या सुरुवातीला युवराज सिंग आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हे दोघे एकत्र दिसले होते. मात्र, मीडियामध्ये आलेल्या वृत्तांनुसार किमची बॉलिवूड पार्श्वभूमी आणि जीवनशैली यामुळे युवराजच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याच्या आईचा या नात्याला विरोध होता. याच कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो.

झहीर खान आणि ईशा शरवानी

झहीर खान आणि अभिनेत्री ईशा शरवानी यांचे नाते जवळपास आठ वर्षे चर्चेत होते. २०११ च्या विश्वचषकानंतर त्यांच्या लग्नाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, २०१२ च्या सुमारास त्यांनी अत्यंत शांतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही ठोस कारण कधीच समोर आले नाही, परंतु सूत्रांनुसार दोघांनीही अतिशय संयमाने आपापल्या वाटा वेगळ्या केल्या.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा