Headlines

पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांची संमती, सरकारचे ‘डीपीआर’ तयार करण्याचे आदेश; कोणत्या गावांमध्ये प्रकल्प?| Maharashtra Times


म.टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिल्यानंतर या विमानतळाचा ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (डीपीआर) तयार करण्याचा आदेश राज्य सरकारने या विमानतळासाठी स्थापन केलेल्या ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ला (एसपीव्ही) दिला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत विमानतळ उभारण्यासाठीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत.

१,२१६ हेक्टर क्षेत्र संपादीत करणार

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी पुरंदर विमानतळासाठी निधी उभारण्यासाठी ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ची (एसपीव्ही) स्थापना केली आहे. त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (एमएडीसी), शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको); तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) समावेश आहे. यात सर्वाधिक ५१ टक्के हिस्सा सिडकोचा असून, एमएडीसी १९ टक्के, तर ‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए’चा प्रत्येकी १५ टक्के हिस्सा आहे. विमानतळासाठी राज्य सरकारने सहा हजार कोटींचा निधी ‘हुडको’ या वित्तीय संस्थेतर्फे उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात भूसंपादन सुरू झाले आहे. आता १,२१६ हेक्टर एवढेच क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी ९१ टक्के क्षेत्राच्या संपादनास शेतकऱ्यांनी मान्यता दिली आहे.

Maharashtra TimesWeather Update: पुण्यात पावसाने मोडला १२ वर्षांचा विक्रम, घाटांमध्ये ‘रेड अलर्ट’; चार दिवस राज्यात पाऊस थैमान घालणार

पुण्यात काही प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळासाठी सर्वाधिक वेगाने भूसंपादन होत असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले होते. त्या वेळी ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे स्पष्ट करून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

त्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीला सिडको, वाहतूक, वित्त; तसेच नगरविकास विभागाचे सचिव आणि ‘एमआयडीसी’चे अधिकारी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्य सचिव अगरवाल यांनी पुरंदर विमानतळाबाबत माहिती घेऊन पुढील प्रक्रियेसाठी आदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मंत्रालयात काल झालेल्या बैठकीतील निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विमानतळासाठी ‘डीपीआर’ तयार करण्याचा आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात त्याची जबाबदारी ‘एसपीव्ही’तील कोणत्या विभागाकडे असेल हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. या प्रक्रियेत जिल्हा प्रशासन भूसंपादन करण्याबरोबर या प्रक्रियेला आवश्यक ती मदत करण्याची भूमिका पार पाडणार आहे.

संमतीला शेवटची मुदतवाढ

पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आतापर्यंत ९१ टक्के शेतकऱ्यांनी संमती देणारी प्रतिज्ञापत्रे प्रशासनाकडे दिली आहेत. आतापर्यंत असलेली मुदत संपुष्टात आली असून, शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्रे, संमती देण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमानतळासाठी जमीन देण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

Maharashtra TimesPune News: पुणेकरांना दिलासा मिळणार, मुसळधार पावसानंतर शहरातील पाणीकपात रद्द; वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

पुरंदर तालुक्यातील उदाची वाडी, कुंभारवळण, एखतपूर, वनपुरी, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधून १२१६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. एक कोटी ६१ लाख रुपये प्रतिएकर असा दर राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांकडून संमती घेण्यास प्रशासनाने सात मे पासून सुरूवात केली. त्या वेळी १० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यात वाढ करून ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत कौटुंबिक वादविवाद होते. ते सोडविण्यासाठी वेळ लागत असल्याने पुन्हा १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे ९१ टक्के म्हणजेच ११०१ हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे ११६ हेक्टर क्षेत्राची संमती बाकी आहे. ११०१ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ५० टक्क्यांपर्यंतच्या जमिनीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत