म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (‘म्हाडा’) दुसऱ्या टप्प्यात ६३४ सदनिका रिक्त असून, संगणकीय सोडत पद्धतीने या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात ‘म्हाडा’ने काढली असून, सोमवारपासून (२० जुलै) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, या शिल्लक सदनिकांसाठी उत्पन्नाची अट शिथिल केली आहे.
‘म्हाडा’ने ताथवडे येथील ७९२ सदनिकांसाठी एप्रिलमध्ये जाहिरात दिली होती. त्यात २४ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी, ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी होत्या. त्यानुसार मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिकांसाठी ३०४ अर्ज आले होते. त्यातील १५० सदनिकांचे वितरण सुरू केले होते. उर्वरित ६३४ सदनिकांसाठी दुसऱ्यांदा जाहिरात दिली होती. त्यानुसार ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत या शिल्लक सदनिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, रामचंद्र भोसले, मिळकत व्यवस्थापक रूपेश जायभाये आदी या वेळी उपस्थित होते.
अल्प उत्पन्न गटातील सदनिकेची किंमत ४६ ते ४७ लाख रुपये असून, बांधकामाचे क्षेत्रफळ ७६.९६ ते ७७.९९ चौरस मीटर आहे. मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत ७६८ सदनिका असून, प्रतिसदनिका किंमत ६४ लाख ५० हजार ते ६५ लाख ५० हजार रुपये असून, क्षेत्रफळ ८९.१५ ते ९१.१८ चौरस मीटर आहे. मात्र, किंमत जास्त असल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
“प्रत्येक सदनिकेसाठी विनामूल्य चारचाकी पार्किंग, जलतरण तलाव, इनडोअर गेम एरिया, मुलांसाठी खेळण्याची जागा, सोलार ऑन-ग्रीड, ईव्ही चार्जिंग, क्लब हाउस, ओपम जिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या योजनेतील उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली आहे,” शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा
म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत ताथवडे प्रकल्पातील घरांसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आणि १००% ऑनलाइन आहे. अर्ज भरण्यापूर्वी खालील सर्व कागदपत्रे तयार ठेवा: ओळख व पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड आणि पॅन कार्ड (पती-पत्नी दोघांचे असल्यास दोन्ही) अधिवास प्रमाणपत्र : महाराष्ट्राचे सन २०१८ नंतरचे बारकोड असलेले डोमासाईल प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला: आयकर विवरण पत्र (ITR) किंवा तहसीलदारांचा दाखला (आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६). बँक तपशील: रद्द केलेला चेक किंवा पासबुकचे पहिले पान. इतर: पासपोर्ट आकाराचा फोटो (50 KB पर्यंत), मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला) आणि ई-मेल आयडी.
त्यानंतर त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अर्जाचे शुल्क व अनामत रक्कम भरणे गरजेचं आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा