Headlines

परभणी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्तास्थापन; भाजपच्या लता वाकळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड| Maharashtra Times


Parbhani ZP President: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यावेळी एकमेव अर्ज मिळाला असल्याने परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध भाजपच्या अध्याक्षांची निवड झाली आहे.

parbhani elections
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष आज बिनविरोध निवडला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या लता वाकळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्रीकांत विटेकर यांचा देखील एकमेव झाल्याने त्यांची देखील उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे एकंदरीतच आज तगायत परभणीच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा कधीच जिल्हा परिषद अध्यक्ष झाला नव्हता पण इतिहासात ही पहिली वेळ लता वाकळे यांच्या रूपाने आली आहे. अध्यक्षांनी उपाध्यक्षाची बिनविरोध निवड झाल्याने परभणी जिल्हा परिषदेमध्ये महायुती चा झेंडा फडकल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही पक्षाला बहुमत नाही

परभणी जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 15 जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सहा जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटाने पाच जागा जिंकल्या तीन जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आणि एक जागा ही अपक्षाने जिंकली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे कोणत्याही दोन-तीन पक्षाला एकत्र येऊनच जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करावी लागणार होती.

Maharashtra TimesAshok Kharat : बड्या नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक, महिलेवर अत्याचाराचा आरोप, पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ

जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करणार असा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आम्ही सत्तेत घेणार नाही असे देखील त्या म्हणाल्या होत्या त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांनी भाजपला वगळून काही समीकरण जुळते का याची तयारी सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नवीन समीकरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि अपक्ष या सर्वांनी साथ दिली. भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एकवटल्यानंतर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घातले आणि काल मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत परभणी जिल्हा परिषदेमध्ये महायुती तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी माहिती दिली.

त्यानंतर आज परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर अध्यक्षपदासाठी भाजपकडून लता वाकडे आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्रीकांत विटेकर या दोघांचेच एकेक अर्ज आले. अन्य कोणतेही अडचण आल्याने या दोघांची बिनविरोध निवड झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्तेत आली आहे. ऐनवेळी माहिती झाल्याने मात्र महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मात्र भ्रमनिराश झाला आहे कुठेतरी सत्तेची स्वप्न त्यांना लागली असतानाच ऐनवेळी महायुती एकजूट झाल्याने मात्र महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर याची बाजी

परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बाजी मारली असल्या जादा स्पष्ट झाले आहे लता वाकळे या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून येत असून सांगवी माळसा या गटामधून त्या निवडून आलेले आहेत परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी सुटले होते आणि जिंतूर तालुक्यातील सांगवी म्हाळसा या गटातून निवडून आलेल्या लता विजयकुमार वाकळे या आता अध्यक्ष झाले आहेत अध्यक्षपद हे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची ताकद आणखीन एकदा वाढणार आहे.

Maharashtra TimesMumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू

उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर यांची निवड

त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी श्रीकांत विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनविरोध निवडून आले आहेत श्रीकांत विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेश विटेकर यांचे बंधू आहेत त्यामुळे आमदार राजेश विटेकर यांची देखील ताकद आता चांगलेच वाढली आहे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे राजे शिवठेकर त्यांच्या भावाच्या निमित्ताने मात्र त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आपली ताकद कायम ठेवली आहे. आमदार राजेश विटेकर हे देखील पूर्वी याच परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते त्यामुळे जिल्हा परिषदेवरची पकड त्यांनी मात्र डेली होऊ दिली नाही आपल्या भावाच्या रूपाने त्यांनी उपाध्यक्ष पद आपल्याकडे ठेवून जिल्हा परिषदेत आपली ताकद त्यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित केली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा