![]()
ज्यांच्या स्मृती थोड्या ताज्या आहेत, त्या सर्वांना शाळेत शिकत असताना आपण कोणत्या श्रेणीत होतो हे आठवत असेल. तर जे लोकत्या वेळी खूप हुशार होते, पहिल्या बाकावर बसायचे, ते आज कुठे आहेत आणि ज्यांना वर्गात कुणी विचारतही नव्हते, ते कुठे आहेत, याचा शोधघ्या. एक गोष्ट समोर येईल की यशासाठी केवळ हुशार मेंदू आणि खूपजास्त योग्यताच कामाला येत नाही. आणखी एक गोष्ट आहे, जीयशाला पूर्ण करते आणि ती म्हणजे- संधीचा लाभ उठवणे. जेव्हा आपण मिळालेल्या संधींचा लाभ घेतो, तेव्हा यशाची शक्यता वाढते.संधी सर्वांना मिळतात, तुम्ही ती कशी पकडता, याचे एक उदाहरण हनुमानजी देतात. सुंदरकांड हनुमानजींसाठी एक संधी आहे, ज्यामध्ये श्रीरामांनी हनुमानजींची निवड केली की त्यांनी लंकेत जावे. संधी आयुष्यात आली, हनुमानजींनी ती पकडली आणि त्या एका रात्रीत हनुमानजी संपूर्ण जगात रामदूत या नावाने ओळखले गेले. संधींची ओळख होणे हीच यशाची गुरुकिल्ली ठरते.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संधी शोधण्यापेक्षा त्या ओळखणे आवश्यक
