![]()
आपला आत्मा आपल्याशी बोलत असतो, पण आपण ते ऐकू शकत नाही, ही गोष्ट वेगळी. आयुर्वेद विज्ञान सांगते की, निसर्गात जीपंचतत्त्वे आहेत, तीच आपल्या आतही आहेत. ध्वनीचे प्रतिनिधित्व आकाश करते. एक आकाश आपल्या आत आहे, तर एक आकाशबाहेर. जे लोक बाहेरच्या आकाशावर लक्ष केंद्रित करतात, त्याचा ध्वनी ऐकतात, त्यांना जगातल्या भौतिक गोष्टी मिळतील, पण जर आपण आतल्या आकाशावर लक्ष केंद्रित केले, तर आपले मन शून्य होईल. आपण नादब्रह्म ऐकू शकू आणि आपल्याला आपल्याच आत असलेला परमेश्वर गवसेल. त्यामुळे निसर्गाकडून आपण काय घेऊ शकतो, हेच आपल्याला समजत नाही. जसे आजही अनेक वृद्ध लोकबाजारात तारुण्य विकत घ्यायला निघतात, बालपण उधार घ्यायला निघतात, तर ते त्यांना मिळेल का? पृथ्वी, जल, अग्नी आणि वायूचातर आपण आधीच दुरुपयोग केला आहे. आता आपण ध्वनी प्रदूषणाच्या क्षेत्रातही प्रवेश करत आहोत. ध्वनीचा संबंध बोलण्या आणि ऐकण्याशी आहे. ‘चांगले बोला आणि चांगले ऐका’ याचीही एक आध्यात्मिक मोहीम सुरू व्हायला हवी.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चांगले बोलणे ऐकण्याचीही आध्यात्मिक मोहीम असावी
