Headlines

नाशिकचा मराठमोळा सुपुत्र दिलीप गावितने राष्ट्रकुल गाजवलं, 100 मीटरमध्ये भारताला सुवर्ण, एकाच रेसमध्ये दोन पदकं


Dilip Gavit Gold Matrathi News : भारताच्या वाघांची कमाल, एकाच रेसमध्यो दोघांनी पदके नावावर केलीत. एकाने सुवर्ण तर एकाने रौप्य पदक जिंकले. सुवर्णपदक जिंकणारा नाशिकमधील आदिवासी सुपुत्र असून त्याने इतिहास रचला आहे. आंबच्या झाडावरून पडल्यानंतर उपचारावेळी हात कट करावा लागला, तिथून ते सुवर्णपदकापर्यंतच त्याचा प्रवास सोपा नव्हता. दुसरीकडे रौप्यपदक मिळवणारा बासिल याला जन्म झाल्यापासून हात नव्हता. पण दोघेही वाऱ्याच्या वेगासारखे सुसाट सुटले आणि भारताचा गौरव वाढवला.

Dilip Gavit Gold in Commonwealth gamws 2026
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महाराष्ट्रातील नाशिकच्या सुपुत्राने सुवर्णपदकावर नाव करत इतिहासा रचला आहे. पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताने दमदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १०० मीटर टी४७ अंतिम शर्यतीत भारताने गोल्ड (सुवर्ण) आणि सिल्वर (रौप्य) दोन्ही पदके पटकावली. दिलीप महादु गावितने १०.७१ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. यासोबतच त्याने गेम्स रेकॉर्डही मोडला आणि हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. तर मोहम्मद बासिल मोर्सिंगनाकथने १०.८३ सेकंदांसह शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले.

दिलीप गावित कोण आहे?

महाराष्ट्रातील नाशिकजवळील तोरण डोंगरी या छोट्याशा गावात जन्मलेला दिलीप एका सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे. लहानपणापासूनच आपल्या आई-वडिलांसोबत शेतात काम करायचा. अवघ्या पाच-सहा वर्षांचा असताना झाडावरून पडल्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे ती जखम गॅंग्रीनमध्ये बदलली आणि अखेर त्यांचा हात कोपराच्या खालून कापावा लागला.
Maharashtra TimesSakshi Chaudhary Boxing : शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी, बॉक्सर साक्षीनं पदक पक्कं करत रचला इतिहास, एका टर्निंग पॉइंटने बदललं आयुष्य

मोहम्मद बासिल कोण?

या रेसमध्येच रौप्यपदक जिंकणारा केरळचा मोहम्मद बासिल याचा जन्म झाला तेव्हाच त्याला उजवा हात नव्हता. ज्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेची निवड चाचणी झाली होती त्यावेळी बासिलने १०.६४ सेकंदात पूर्ण करत आता सुवर्ण जिंकलेल्या गावितला मागे टाकले होते. मात्र फायनल सामन्यामध्ये दिलीपने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.


Maharashtra TimesSharmila Dhankar : दोन वर्षांची असताना पोलिओ, घरगुती हिंसाचाराच्या होरपळीतून सुवर्णझेप; शर्मिला धनखडचा संघर्षमय प्रवास

गुलवीर सिंहचे रौप्य

भारताच्या गुलवीरसिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी केली. बोचरी थंडी, सतत पडणारा पाऊस यास दाद न देता गुलवीरने हुशारीने स्पर्धा करून मंगळवारी रात्री रूपेरी यश मिळवले. या २५ फेऱ्यांच्या शर्यतीत गुलवीरने सातत्याने आघाडीच्या स्पर्धकांत स्वतःला राखून अखेरच्या मीटरमध्ये घेतलेली मुसंडी निर्णायक ठरली. अखेरच्या चारशे मीटरची बेल झाली आणि ऑस्ट्रेलियाच्या की रॉबिन्सनने सुवर्णपदक जिंकण्यासाठी वेग कमालीचा वाढवला. २८ वर्षीय उत्तर प्रदेशच्या गुलवीरनेही हेच केले आणि त्याने २७ मिनिटे ४९.७८ सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. रॉबिन्सनची वेळ २७ मिनिटे ४८.९३ सेकंद अशी होती.
Maharashtra TimesCommonwealth Games 2026 : दीडशे रुपये रोजंदारी, ते राष्ट्रकुल रौप्य… सायकलवरून रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ऋषिकांत सिंगची संघर्षगाथा

हरजिंदर कौरला रौप्य

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चार वर्षांपूर्वीची कामगिरी माफक सुधारण्यात भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौर यशस्वी ठरली. गतस्पर्धेत ब्राँझवर समाधान मानावे लागलेल्या हरजिंदरने वेटलिफ्टिंगमधील महिलांच्या ६९ किलो गटात रौप्यपदक मिळवले. स्पर्धा संपताना खडतर आव्हान आपण पार केल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.