Headlines

नाद नाही करायचा! रन मशीन विराटची इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत फिफ्टी; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरचा कोणता रेकॉर्ड मोडला?


Virat Kohli Record : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहलीने आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरलं. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनत त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं.

Virat Kohli Record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेदरम्यान विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला. या विक्रमासाठी त्याला केवळ चार धावांची गरज होती. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत विराटने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आणि इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. एवढच नाही तर विराट कोहलीने या डावात खेळताना 50 धावांचा टप्पाही पार केला. त्याने 50 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं असून 27 व्या षटकापर्यंत भारताच्या 150 धावा झाल्या आहेत. तर विराट 56 धावांवर खळत आहे. तर इशान किशन 1 वर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर त्याला साथ देत आहे.

राहुल द्रविडला टाकलं मागे

कार्डिफमधील सोफिया गार्डन्सवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल 31 धावा करून बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. डावाच्या नवव्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. यापूर्वी राहुल द्रविडच्या नावावर इंग्लंडमध्ये 2645 आंतरराष्ट्रीय धावा होत्या. विराटने त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले.

Maharashtra TimesVirat Kohli Record : नाद नाही करायचा! रन मशीन विराटची इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत फिफ्टी; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरचा कोणता रेकॉर्ड मोडला?

इंग्लंडमध्ये विराटची दमदार कामगिरी

इंग्लंडमध्ये विराट कोहलीची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. त्याने कसोटीत 1096, वनडेत 1358 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 192 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील एकूण आंतरराष्ट्रीय धावसंख्या 2646 वर पोहोचली. या यादीत विराटनंतर राहुल द्रविड (2645), सचिन तेंडुलकर (2626), रोहित शर्मा (2298) आणि सौरव गांगुली (1949) यांचा समावेश आहे.

Maharashtra TimesGurnoor Brar : इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई, नेमकं काय घडलं? गुरनूरची प्रतिक्रिया काय?

दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल

या सामन्यासाठी इंग्लंडने लियाम डॉसन आणि जोश टंग यांच्या जागी साकिब महमूद व गस अॅटकिन्सन यांना संधी दिली. भारताच्या संघातही एक बदल झाला असून आजारी असलेल्या केएल राहुलच्या जागी ईशान किशनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा