Headlines

भारत वि. इंग्लंड दुसरा वनडे, के.एल. राहुल प्लेइंग 11 मधून बाहेर; कॅप्टन शुभमन गिलची इच्छा नसताना घ्यावा लागला निर्णय


मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील दुसरा वनडे सामना सुरू झाला आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक याने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांना भारतीय गोलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीमुळे चांगलाच महागात पडला. त्यामुळेच टॉस जिंकत ब्रूक याने पहिल्यांदा बॉलिंग निवडली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघात एकमेव आणि मोठा बदल पाहायला मिळाला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हन मधून स्टार खेळाडूला बाहेर करण्यात आले असून त्या ठिकाणी झालेली आहे. स्टार खेळाडू के एल राहुल आजारी पडल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. याबाबत शुभमन गिल याने माहिती दिली आहे.

भारतीय संघामध्ये एकच बदल करण्यात आलेला आहे, मात्र बाकी तोच संघ खेळवण्यात आला आहे. के.एल. राहुल हा खेळत नाहीये, त्यामुळे t20 च्या रँकिंग मध्ये नंबर वन असलेल्या ईशान किशन याला आज संधी मिळाली आहे. या संधीचं तो सोनं करतो की नाही हे पाहावं लागणार आहे. आज भारताची बॅटिंग पहिल्यांदा असल्यामुळे सुरुवातीला रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला पाहायला दिसतील. पहिला वनडे जिंकल्यामुळे संघामध्ये एकूणच पाहता सकारात्मक ऊर्जा दिसत आहे, भारताने दोन मालिका कमवल्यानंतर वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे.
Maharashtra TimesICC World Cup New Format : वनडे वर्ल्ड कपसोबत टी-20 चाही फॉरमॅट बदलला, आयसीसीने असा निर्णय का घेतला? जाणून घ्या
मागील सामन्यामध्ये म्हणजेच पहिल्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकर आऊट वाद झाले होते. आज परत एकदा दोघांची बॅटिंग पाहण्यासाठी सर्व चाहते आतुर आहेत. कर्णधार शुभम गिल आणि गुरनूर ब्रार हे दुखापती झाल्याने त्यांना मैदान सोडावं लागलं होतं. मात्र आजच्या सामन्यात त्यांनी कमबॅक केले आहे.
Maharashtra TimesINDvsENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन बदलणार? सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरू होणार?
भारत (Playing 11): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंड (Playing 11): बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, गस ॲटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत