Headlines

नागपूरची खाजगी रुग्णालये मनपाच्या रडारावर; विशेष पथक ऑडिट करणार पार्किंगच्या जागा, खाटांच्या संख्येची होणार पाहणी


Nagpur News: शहरामध्ये खाजगी रुग्णालयांमध्ये नियमांच उल्लंघन होत असल्याने नागपूर महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला.

खाजगी रुग्णालये मनपाच्या रडारवर
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,नागपूर : नगरसेवकांच्या प्रश्नांना वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यावर महापौर नीता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावरही आरोग्य विभागाकडून सभागृहात योग्य माहिती देण्यात आली नव्हती.

महापौरांनी व्यक्त केला संताप

वारंवार अपुरी माहिती सादर केली जात असेल, तर संबंधितांवर कारवाई का करू नये, असा संतापही महापौरांनी व्यक्त केला. त्यानंतर महापौरांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देत, नगरसेवकांकडून अतिरिक्त खाटा असलेल्या रुग्णालयांची माहिती सभागृह संपण्यापूर्वी घ्यावी आणि त्यावर कोणती कारवाई केली जाणार, हे स्पष्ट करावे, असे सांगितले.

खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक खाटा लावल्या जात असल्याच्या तसेच पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूर महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपासणीसाठी महापालिकेकडून विशेष पथक

या तपासणीसाठी महापालिकेकडून विशेष पथक गठीत करण्यात येणार असून, रुग्णालयातील खाटांची संख्या, पार्किंगच्या जागांचा वापर, अतिक्रमण आदी बाबींची तपासणी हे पथक करणार आहे. याबाबतचा अहवाल एक महिन्यात तयार करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेने गुरुवारी दिली.

सभेत अनियमिततांचा मुद्दा उपस्थित

महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. या सभेत भाजपचे नगरसेवक रितेश पांडे यांनी खासगी रुग्णालयांमधील अनियमिततांचा मुद्दा उपस्थित केला. ‘शहरात १०० किंवा त्याहून अधिक खाटा असलेली किती रुग्णालये आहेत, तसेच २५ खाटांची मंजूर क्षमता असताना ३० खाटा लावणाऱ्या रुग्णालयांवर काय कारवाई करण्यात आली,’ अशी विचारणा पांडे यांनी केली होती.

रुग्णालयांतील पार्किंगच्या सोयीबाबत प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनीही खासगी रुग्णालयांतील पार्किंगच्या सोयीबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘नियमानुसार पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या रुग्णालयांवर कोणती कारवाई झाली,’ अशी विचारणा त्यांनी केली.

Maharashtra TimesMumbai Crime : धावत्या मुंबई लोकलमधून ढकललं, दिव्यांग वृद्धाचा मृत्यू; कावळा हुसकवताना चुकून धक्का, आरोपी सहप्रवाशाचा बनाव

प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नाही

रुग्णालयांमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक खाटा आढळल्यास संबंधित डॉक्टर व रुग्णालयांवर कारवाई केली जाते, अशी माहिती डॉ. सेलोकर यांनी दिली. मात्र, अलीकडच्या काळात अशा किती कारवाया करण्यात आल्या, याबाबत विचारणा झाल्यावर ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत.

नियमित तपासणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई

अनेक खासगी रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेत ओपीडी, डायग्नोस्टिक सेंटर, तसेच काही ठिकाणी खाटाही टाकल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हा नियमांचा स्पष्ट भंग असल्याचे सांगत रुग्णालयांची नियमित तपासणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

माहिती देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केलं जाणार

यानंतर इटनकर यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी केली जाईल, असे आश्वासनदिले. या तपासणीत खाटांची संख्या, मंजूर क्षमता आणि पार्किंगच्या जागांचा प्रत्यक्ष वापर याची पाहणी केली जाईल. नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील रुग्णालयांमध्ये नेमक्या किती खाटा आहेत आणि त्यांची उपलब्धता काय आहे, याची माहिती देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, अशी इटनकर यांनी सभागृहात दिली.

Maharashtra TimesMumbai Crime : मिरची पूड टाकून बेसावध केलं, घरातच निर्घृणपणे संपवलं, सुनेचा काटा काढण्यासाठी सासूची मोलकरिणीच्या कुटुंबाला सुपारी; मुंबईत खळबळ

महापौर नीता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली .

नगरसेवकांच्या प्रश्नांना वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यावर महापौर नीता ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावरही आरोग्य विभागाकडून सभागृहात योग्य माहिती देण्यात आली नव्हती.

कोणती कारवाई केली जाणार, हे स्पष्ट करावे

वारंवार अपुरी माहिती सादर केली जात असेल, तर संबंधितांवर कारवाई का करू नये, असा संतापही महापौरांनी व्यक्त केला. त्यानंतर महापौरांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देत, नगरसेवकांकडून अतिरिक्त खाटा असलेल्या रुग्णालयांची माहिती सभागृह संपण्यापूर्वी घ्यावी आणि त्यावर कोणती कारवाई केली जाणार, हे स्पष्ट करावे, असे सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा