Headlines

देवदत्तचा सर्वात मोठा रेकॉर्ड! 150 वर्षांत कोणालाच जमलं नाही, ते पडिक्कलने करून दाखवलं; स्वातंत्र्यदिनी नेमकी कोणती कामगिरी?


IND vs SL Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावत इतिहास रचला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत नंबर-३ वरील भारताचा प्रदीर्घ दुष्काळ संपवला. या शतकासह पडिक्कलने कोणते मोठे विक्रम केले?

devdutt padikkal century record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या फलंदाजीचा असा काही डंका वाजवला आहे की, क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या पडिक्कलने या संधीचे सोने करत १७८ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १३१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली.

१५० वर्षांच्या इतिहासात पहिलाच भारतीय

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात आजवर एकाही भारतीय फलंदाजाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नव्हते. पडिक्कलने गॉलच्या मैदानावर शतक पूर्ण करताच स्वातंत्र्यदिनी शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा अनोखा आणि ऐतिहासिक मान मिळवला.

Maharashtra TimesIndia vs Sri Lanka : तिरंगा डौलात, स्कोअरबोर्ड जोमात! टीम इंडियाचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध धुमाकूळ, 4 सुपरस्टार्सचा जलवा, दुसऱ्या दिवसाची रणनीती कशी असणार?

गांगुलीनंतर २१ व्या शतकातील दुसराच डावखुरा फलंदाज

या ऐतिहासिक शतकासोबतच पडिक्कलने २१ व्या शतकात (२००१ पासून) एका खास विक्रमाची नोंद केली आहे. २१ व्या शतकात भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर (No. 3) फलंदाजी करताना शतक झळकावणारा तो केवळ दुसराच डावखुरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिल्ली कसोटीत जिम्बाब्वेविरुद्ध १३६ धावांची खेळी करत हा पराक्रम केला होता. गांगुलीनंतर तब्बल २४ वर्षांनी पडिक्कलने ही किमया करून दाखवली आहे.

devdutt padikkal century

तसेच, संपूर्ण भारतीय कसोटी इतिहासात नंबर-३ वर शतक ठोकणारा तो एकंदरीत ८ वा डावखुरा फलंदाज बनला आहे. याआधी विनोद कांबळी (४ शतके), सौरव गांगुली (३ शतके), सलीम दुर्रानी, बापू नादकर्णी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर आणि सुरिंदर अमरनाथ या दिग्गजांच्या यादीत आता पडिक्कलचे नाव जोडले गेले आहे.

नंबर-३ च्या शतकाचा दुष्काळ संपला

भारतीय संघासाठी नंबर-३ वर शेवटचे कसोटी शतक सप्टेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शुभमन गिलने झळकावले होते. त्यानंतर सलग १९ कसोटी सामन्यांमधील ३५ डावांमध्ये भारताने तिसऱ्या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना आजमावले होते. मात्र, त्यांना केवळ २७.२८ च्या सरासरीने ५ वेळाच पन्नासपेक्षा जास्त धावा करता आल्या होत्या. पडिक्कलने हे खणखणीत शतक ठोकून नंबर-३ वर असलेला प्रदीर्घ दुष्काळ संपवला आहे आणि भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या दूर केली आहे.