Headlines

दत्ता मायाळू, नावात ‘राज’ जोडलं, राजदत्त यांना ‘फिल्मफेअर जीवनगौरव’; सचिन पिळगावकरांनी सांगितल्या खास आठवणी


सिनेविश्वात मानाचा मानला जाणारा फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी २०२६ सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला मराठी तसंच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली तर राजदत्त यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Filmfare Marathi Awards:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी

चित्रपटसृष्टीतील लाडकी ब्लॅक लेडी कुणाला मिळते, याची उत्सुकता गुरुवारी झालेल्या रंगतदार सोहळ्यात बघायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाला मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती होती. यंदा पुरस्कार सोहळ्याचे ११वे वर्ष होते. विलेपार्ले येथील हॉटेल सहारा स्टारमध्ये हा फिल्मफेअर ॲवॉर्ड मराठी २०२६ सोहळा पार पडला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘राज’ हा शब्द स्वतःच्या नावापूर्वी जोडला

राजदत्त यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सचिन यांनी गौरव केला. ‘आमच्या दत्ताकाकांचा फिल्मफेअर मराठी पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. त्यांचे पूर्ण नाव दत्ता मायाळू आहे. मात्र, दिग्दर्शक झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंचे ऋण मान्य करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी आपले गुरू राजा परांजपे यांच्या नावातील ‘राज’ हा शब्द स्वतःच्या नावापूर्वी जोडला आणि ते ‘राजदत्त’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मी साधारण साडेचार-पाच वर्षांचा असताना दत्ताकाका राजा परांजपे यांचे मुख्य सहायक होते आणि त्याच काळापासून आमचा एकत्र प्रवास सुरू झाला. राजाभाऊ अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही कामांत व्यग्र असायचे. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या दत्ताकाका सांभाळायचे. त्याचबरोबर ते माझीही काळजी घ्यायचे. रात्रीचे चित्रीकरण सुरू असताना मला थंडी वाजायची. ते मला उचलून स्टुडिओतील मोठ्या दिव्याजवळ घेऊन उभे राहायचे. त्यावेळी मला वाटले नव्हते की, इतक्या वर्षांनंतर त्यांनाच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा सन्मान मला मिळेल’, अशी भावना यावेळी सचिन यांनी व्यक्त केली.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘आता थांबायचं नाय!’ने मारली बाजी

यंदाच्या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय!’ या चित्रपटाने सर्वाधिक आठ पुरस्कार पटकावत बाजी मारली. तसेच दिलीप प्रभावळकर, अमृता सुभाष, ऋता दुर्गुळे, सिद्धार्थ जाधव, अनिता दाते आदी कलाकारांनी विविध श्रेणींमध्ये मानाचे पुरस्कार जिंकले. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा