Headlines

तो पुन्हा आला! मराठी छोट्या पडद्यावर मोठं पक्षांतर, झी मराठीचा सुपस्टार स्वगृही, जोरदार कमबॅक


Star Pravah Actor in Zee Marathi Tv Serial:मराठी छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. झी मराठी वाहिनीवरची कमळी ही मालिका सध्या चर्चेत आहे. आता या मालिकेत एका सुपरस्टार अभिनेत्याची चर्चा होत आहे.

Star Actor Comeback on Zee Marathi:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची बरीच चर्चा झाली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे नेते चर्चेचा विषय ठरले. तसंच एखाद्या वाहिनीवरून कलाकार दुसऱ्या वाहिनीच्या मालिकेत दिसला तर प्रेक्षकांच्या भुवया उंचवतात अन् याची चर्चाही बरीच होते. आता मराठी छोट्यापडद्यावर असंच पक्षांतर होतंय. लोकप्रिय अभिनेता स्वगृही परतल्याचं म्हटलं जात आहे. झी मराठीच्या गाजलेल्या मालिकेतील स्टार अभिनेता पुन्हा बऱ्याच वर्षांनी आता एका लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे.

झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात सुपरहिट हिरोचा धमाकेदार कमबॅक, तुमचा अंदाज कमेंट्समध्ये नक्की सांगा…असं म्हणत एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यावरून नेटकऱ्यांनी या अभिनेत्याला ओळखलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून अभिनेता शशांक केतकर आहे.

होणार सून मी या घरची या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला शशांक गेल्या काही वर्षात स्टार प्रवाहच्या वेगवेगळ्या मालिकेत झळकला . आता तो झी मराठीच्या कमळी या मालिकेत दिसणार आहे. यात तो एका युवा राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं पाहायला मिळतंय.यावर अद्याप शशांकनं प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी त्याला कमबॅकसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी तो २०२१ मध्ये ‘पाहिले न मी तुला’ या झी मराठीच्या मालिकेत दिसला होता.
Maharashtra TimesMonika Dabade: आई झाल्यानंतर दोन महिन्यांतच शूटिंगला सुरुवात, ‘ठरलं तर मग’ फेम अस्मितानं सांगितलं खरं कारण

दरम्यान, ‘ स्टार प्रवाह ‘ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तब्बल चार वर्षे आणि १४०० हून अधिक भागांचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर ही मालिका संपली. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्यासह सुलेखा तळवलकर, अभिजीत चव्हाण, निशाणी बोरुले आणि प्रतिमा कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

‘कमळी’बद्दल
कमळी या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका आहे.या मालिकेतील रंजक कथानक, भावनिक गुंतागुंत आणि नात्यांतील चढ-उतार प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. साध्या आणि कष्टाळू मुलीच्या प्रवासावर आधारित असलेल्या या मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तसंच टीआरपीच्या स्पर्धेतही मालिकेनं टिकून आहे.
Maharashtra TimesAshwini Kasar: गावातले ते प्रसंग अभ्यासताना मीही हादरून गेले; ‘एक होतं माळीण’ सिनेमातील भूमिकेबद्दल अश्विनी कासारचा खुलासा
मालिका सुरू झाल्यापासूनच यातील कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. मुख्य भूमिकेतील कलाकारांसोबतआता नवीन पात्रांच्या प्रवेशामुळे मालिकेचा टीआरपी आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

येत्या भागांमध्ये कमळी, ऋषी आणि अनामिका यांच्या नात्यात नेमके काय समीकरण पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.