एका बाजूला अमेरिकेची जागतिक राजकारणातील युद्धनीती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे रखडलेले काम… या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मते ट्रम्प यांच्या युद्ध धोरणांमुळे आखाती देशांत तणाव वाढला, ज्याचा फटका थेट भारताला डांबर मिळण्यात झाला आणि त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली. एवढेच नाही, तर ट्रम्प यांच्या या लहरी स्वभावामुळे निर्माण झालेल्या तणावातून भारतात लोक मद्यपानाकडे वळत असल्याचा अजब दावाही त्यांनी केला आहे. विखे पाटलांच्या दाव्यात खरंच तथ्य आहे का की स्थानिक अपयश झाकण्यासाठी लावलेला राजकीय तर्क आहे? नगर मनमाड महामार्गाचा प्रश्न नेमका काय आहे.. तेच या व्हिडिओत पाहू..