मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना सुरू झाला असून आजच्या सामन्याचा टॉस झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला पहिल्यांदा बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टॉस हरलाय, कारण कर्णधार झाल्यापासून सलग ८ टॉस त्याने जिंकले होते. भारतीय संघामध्ये आजच्या सामन्यामध्ये एक बदल केल्याचं श्रेयस अय्यरने सांगितलं. आज आणखी एक युवा खेळाडू पदार्पण करत आहे. प्लेइंग ११ मध्ये श्रेयसने कोणाला संधी दिली आणि कोणाला खाली बसवलं जाणून घ्या.
श्रेयस अय्यर याने टॉसवेळी बोलताना टीममधून अशोक शर्मा याला खाली बसवल्याचं सांगितलं आहे. त्याच्या जागी प्लेइंग ११ मध्ये यश ठाकूर याची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ आज पहिल्यांदा बॅटिंगला उतरल्यावर झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांसमोर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांचे आव्हान असणार आहे. मागील सामन्यामध्ये अभिषेक लवकर आऊट झाला होता. मात्र पहिल्यांदा बॅटिंग म्हटल्यावर आज तो नक्कीच दमदार कमबॅक करेल अशी आशा आहे. IND vs ZIM 2nd T20 : भारत हरला काय जिंकला काय पण कॅप्टन श्रेयस अय्यरकडे तब्बल 88 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी, नेमका कोणता? पहिल्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याने आपले खरे रूप दाखवले होते. पठ्ठ्याने १८ चेंडूतच ४ चौकार आणि ४ षटकार मारत अर्धशतक ठोकले होते. क्रिकेट इतिहासामधील सर्वात कमी वयाच्या खेळाडूने केलेले पहिले अर्धशतक ठरले होते. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्याच्याकडून चाहत्यांनी खूप आशा असतील. ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा मजबूत बॅटिंग असून फिनिशर रोलसाठी रिंकू सिंग आणि शिवम दुबे असतील. India vs West Indies ODI: टीम इंडियात मोठा उलटफेर, 8 धुरंधरांचा पत्ता कटणार, श्रेयस, इशान, बुमराह आगामी सीरिज मुकणार? नेमकं कारण समोर दरम्यान, गोलंदाजामध्ये मयांक यादव आणि प्रिन्स यादव यांच्याकडे जबाबदारी असेल. आज यश ठाकूर भारताकडून पदार्पण करताना कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यामध्ये मालिका वाचवण्यासाठी झिम्बाब्वे संघ आपली सर्व ताकद लावताना दिसेल.
भारत (प्लेइंग 11): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, यश ठाकूर, मयंक यादव
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा