Headlines

Rajnath Singh Trolling | राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा ;पण ट्रोल होतायत राजनाथ सिंह…


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या देशभरातील जेन झींनी आपल्या यशाचा आनंद साजरा केला. गेले कित्येक काळ नीट पेपर फुटीवरुन धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या तरुणाईने दिल्लीतल्या जंतरमंतर येथे सरकारला आम्ही झुकवल्याची भावना व्यक्त केली. सोशल मिडीयावर आजच्या चर्चेचा केवळ हाच विषय असताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांना मात्र प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

“या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत” यांच्या त्यांच्या विधानाचा दाखला देत कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीच राजनाथ सिंह यांना खोचक टोला लगावला. त्यानंतर सोशल मिडीयावर सिंह यांच्याविरोधात ट्रोलिंगची मालिकाच सुरु झाली आहे. 

अभिजीत दीपके काय म्हणाले?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलनस्थळी आनंद व्यक्त करताना कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटले, “जग झुकत असते, त्याला झुकवण्यासाठी कोणाची तरी गरज असते.” अभिजीत दीपके म्हणाले की, राजनाथ सिंह एकदा म्हणाले होते की एनडीए सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. दीपके पुढे म्हणाले.

 





Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत