IND vs ZIM 2nd T20 News : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज दुसरा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधारा श्रेयस अय्यर याच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे. तब्बल ८८ वर्षांचा रेकॉर्ड तो मोडणार आहे. नेमका काय आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्बेमधील दुसरा सामना आज पार पडणार आहे. या सामन्यात यजमान झिम्बाब्वे संघाला मालिका वाचवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे भारताला विजयी आघाडी मिळवता येणार आहे. आजचा सामना खास आहे कारण तब्बल ८८ वर्षांनंतर एक नवीन इतिहास रचण्याची संधी श्रेयस अय्यरकडे आहे. याआधी क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये कधीही न घडलेली गोष्ट आज घडते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. नेमकं काय विक्रम आहे जो ८८ वर्षांनंतर आज रचला जाऊ शकतो जाणून घ्या.
टी-२० किकेटमध्ये आतापर्यंत सलग सर्वाधिक टॉस जिंकणारा श्रेयस अय्यर पहिला कर्णधार ठरला आहे. पण आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वाधिक टॉस जिंकण्याचा विक्रम इंग्लडच्या वैली हैमंड यांच्या नावावर असून त्यांनी सलग आठवेळा टॉस जिंकले आहेत. मात्र आता ८८ वर्षांनी हा विक्रम श्रेयस अय्यर मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रेयसने आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्याचा टॉस जिंकला तर तो त्याचा नववा सलग जिंकलेला टॉस असेल. क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधील सर्वात जास्त टॉस जिंकणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरणार आहे. India vs West Indies ODI: टीम इंडियात मोठा उलटफेर, 8 धुरंधरांचा पत्ता कटणार, श्रेयस, इशान, बुमराह आगामी सीरिज मुकणार? नेमकं कारण समोर श्रेयस अय्यरने टॉस जिंकले खरे पण आपल्या नेतृत्त्वात संघाला एकच विजय मिळवता आला आहे. आयर्लंड मालिकेपासून त्याच्याकडे भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद दिले गेले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेमध्ये भारताला २-० आणि ४-० असा व्हाईटवॉशचा सामना करावा लागला आहे. मात्र झिम्बाब्व दौऱ्याची सुरूवात भारताने विजयाने केली आहे. Gautam Gambhir vs VVS Laxman : कोच बदलताच टीम इंडिया जिंकली, खेळाडूही चमकले! लक्ष्मणमुळे गंभीरचा पत्ता कट, बीसीसीआय काय निर्णय घेणार? भारताच्या नवोदित गोलंदाजांच्या कामगिरीत चांगली सुधारणा होत असल्याचे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी शुक्रवारी केले. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिकेत आज, शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी जोशी यांनी हे भाष्य केले. Sachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर भारतीय गोलंदाज आपल्या चुकांतून शिकत आहेत, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले. रवी बिश्नोईच्या एका षटकांत इंग्लंडच्या जेकव बेथेलने २९ धावा वसूल केल्या होत्या. मात्र, विश्नोईने झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत २४ धावांच दिल्या, ‘भारतीय संघाला विजयाची नितांत गरज होती. तो साध्य झाला. गोलंदाजांनी त्यात चांगली कामगिरी केली. बिश्नोईने त्याच्या शैलीत माफक बदल केला. त्याचा त्याला फायदा झाला. साईराज बहुतुले यांच्यासह केलेल्या चर्चेचाही फायदा झाला,’ असे जोशी यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा