Headlines

जगातल्या सर्वात वेगवान धावपटूला कोणी दिली मात? बोल्टचा 17 वर्षांचा विक्रम मोडला; 100 मीटरचा नवा बादशाह कोण?


Usain Bolt Record Broken : उसैन बोल्टचा 100 मीटरमधील ९.५८ सेकंदांचा विक्रम १७ वर्षांनंतर मोडला गेला. एका पठ्ठ्याने ९.३९ सेकंदांत रेस पूर्ण करत इतिहास रचला.

Usain Bolt Record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जमैकाचा दिग्गज धावपटू उसैन बोल्ट ( Usain Bolt ) याने २००९ मध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नोंदवलेला सर्वात वेगवान वेळेचा विश्वविक्रम आता इतिहासजमा झाला आहे. पण विशेष बाब म्हणजे, हा १७ वर्षे जुना विक्रम कोणत्याही माणसाने नव्हे, तर चक्क एका रोबोटने मोडला आहे. चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या एका स्पर्धेत या रोबोटने बोल्टलाही मागे टाकणारी जबरदस्त अन् अचंबित करणारी कामगिरी केली आहे.

किती सेकंदात पार केले १०० मीटर

चीनची राजधानी बीजिंगमध्ये शनिवारपासून (२२ ऑगस्ट) ‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स’च्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत चीनच्या सिंघुआ विद्यापीठाच्या तियानझुओ (Tianzhuo) टीमने तयार केलेल्या रोबोट Tiangong ultra ने १०० मीटरची शर्यत अवघ्या ९.३९ सेकंदात पूर्ण करत नवा इतिहास रचला. उसैन बोल्टने २००९ मध्ये ९.५८ सेकंद वेळ नोंदवत हा विक्रम प्रस्थापित केला होता. अर्थात, माणसाने नोंदवलेला हा विक्रम अजूनही अबाधित असला तरी, रोबोटने मात्र वेगाच्या बाबतीत माणसालाही मागे टाकलं आहे.

Maharashtra TimesYashasvi Jaiswal : ज्याची भीती तेच घडलं! यशस्वी जयस्वालला भांडणं पडली महागात, ICCची आतापर्यंतची मोठी कारवाई

वेळेत निम्म्याहून जास्त घट

गेल्या वर्षी झालेल्या या गेम्सच्या पहिल्या हंगामात, १०० मीटर शर्यतीत रोबोटने सर्वोत्तम वेळ २१.५० सेकंद इतकी नोंदवली होती. मात्र, केवळ एका वर्षात तंत्रज्ञानात एवढी प्रगती झाली की हा वेळ निम्म्याहून कमी झाला. त्यामुळे आता हा विक्रम भविष्यात कोणता रोबोट मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

असा होता बोल्टचा तो ऐतिहासिक विक्रम

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ पदकांवर स्वतःचं नाव कोरणारा उसैन बोल्ट हा वेगाचा बादशाह मानला जातो. त्याने ऑगस्ट २००९ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये १०० मीटर शर्यत ९.५८ सेकंदात पूर्ण करून एक असा विक्रम रचला, जो आजतागायत कोणत्याही धावपटूला मोडता आलेला नाही. अनेकांनी प्रयत्न केले, पण बोल्टच्या वेगाची बरोबरी कुणालाच करता आली नाही.

Maharashtra TimesSagar Mali RIP : मराठमोळा बॉडीबिल्डर सागर माळीचे वयाच्या 38व्या वर्षी निधन, मृत्यूचं नेमकं कारण काय?

उंच उडीतही रोबोटचीच बाजी

केवळ १०० मीटर धावण्यातच नव्हे, तर ‘हाय जम्प’ म्हणजेच उंच उडीतही रोबोटने नवा इतिहास लिहिला आहे. तिएनकुंग (Tienkung) नावाच्या रोबोटने चक्क २.८८ मीटर उंच उडी मारली. माणसाच्या बाबतीत हा विक्रम २.४५ मीटर इतकाच आहे.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे रोबोट्स आता क्रीडाक्षेत्रातही माणसांना जोरदार टक्कर देत आहेत. येत्या काळात हे रोबोट्स असे आणखी किती विक्रम आपल्या नावावर करतात, हे पाहणं नक्कीच पाहावं लागेल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा