![]()
गडचिरोली जिल्ह्यातील कोठी-कोरणार मार्गावरील पुलाचा काही भाग अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या पाण्यामुळे खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीत नेमकं काय घडलं? १५ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोलीतील या ‘क्रांतिवीर बाबुराव शेडमाके’ पुलाचे (कोठी-कोरणार पूल) मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला हा पूल परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, अवघ्या तीन वर्षांच्या आतच या पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एवढ्या कमी कालावधीत पूल निकामी झाल्याने बांधकाम विभागाची तांत्रिक देखरेख आणि कंत्राटदाराच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. विरोधक आक्रमक, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पुलाच्या या दुर्दशेवरून स्थानिक नागरिक आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि संबंधित कंत्राटदारावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रोहित पवारांचा सरकारला टोला याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुलाचे फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला थेट लक्ष्य केले आहे. त्यांनी अत्यंत खोचक शब्दांत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काय म्हणाले रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये? “आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल ३ वर्षे व्हायच्या आतच खचला.. छे… छे… खचला नाही.. कदाचित तीन वर्षांची durability चेक करत असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं, जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल.. पूल खचला म्हणलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा..! असो! दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार? आज केवळ पूल खचला, पण गेल्या तीन-चार वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली cost escalation करून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!” रोहित पवरांनी ट्विट केलेले 4 फोटोज.. जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक: पुढील रणनीती, संघटन विस्तार, देशव्यापी आंदोलनाच्या आराखड्यावर मंथन: दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुसऱ्या दिवशीही सुरू असणार आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर संघटनेची पुढील दिशा काय असावी, देशभरात संघटन कसे वाढवायचे, तसेच विविध राज्यांमध्ये जनआंदोलने उभारण्यासाठी कोणती रणनीती आखायची, यावर बैठकीत सविस्तर चर्चा होत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल वाहून गेला:विरोधकांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित पवारांचे सरकारवर टीकास्त्र
