त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
बेकायदा दारू विकणाऱ्या गँगवाडी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून 25.67 लिटर दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ओंकार बाळू सकट (वय 27) राहणार गँगवाडी याच्यावर कर्नाटक अबकारी कायदा 32 व 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाजवळ दारू विकताना माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. विविध कंपन्यांची रम, व्हिस्की व बियर असा 17 हजार 089 रुपये किमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
