Headlines

कोलगाव येथील आणखी एक व्यक्ती पोलिसांकडून ताब्यात


त. भा. शहर वार्ताहर

सावंतवाडी : फिरोज बाबा याला मदत करणाऱ्या कोलगाव येथील राम वडार याला ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यामुळे अटकेत असलेल्या कोलगाव येथील फिरोज बाबा याच्या कारभाराबाबत अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा गितेश राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यासह सासरच्या मंडळीविरोधात जादूटोणा, अघोरी प्रथा आणि शारीरिक व मानसिक आर्थिक छळ केल्याच्या तक्रारीनंतर सातजणांवर ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा वेगाने तपास करीत या गुन्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित फिरोज आदम शेख उर्फ फिरोज बाबा याला रविवारी ठाणे पोलिसांच्या पथकाने कोलगाव येथून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीत फिरोज बाबा याला मदत करणाऱ्यांची सावंतवाडी तालुक्यातील आणखी नावे उघड झाल्याने पोलीस यंत्रणेने मंगळवारी सावंतवाडी कोलगाव येथील राम वडार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुह्याच्या कामी ठाणे पोलिसांच्या पथकाने फिरोज बाबा याच्याकडे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे जप्त केल्याची माहिती पुढे येत असून तपासात आणखी माहिती येणार शक्यता निर्माण झाली

आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत