Maharashtra Farmer: मागील काही वर्षांत दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे हंगामाच्या सुरुवातीलाच आव्हान उभे राहिल्याने गावगाड्यात चिंतेचे ढग गडद झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यात सर्वाधिक पाच लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र कापसाचे आहे. याखालोखाल सोयाबीनचे क्षेत्र आहे. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यावर केलेल्या पेरण्या साधतात, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. पण गेल्या काही वर्षात मृग नक्षत्र कोरडा जात असल्याचा अनुभव आहे. गेल्या काही दिवसांत तापमान कमी झाल्याने पावसाची आशा वाढली. रोज ढगाळ वातावरण असल्याने मुसळधार पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होते. पण, पाऊस होत नसल्याने शेतकरी हादरला आहे. मुळात यवतमाळ जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. मागील काही वर्षांत खरीप पिकांची पैसेवारी ४६ टक्के निघाली. महसूल व कृषी विभागाच्या नियमाप्रमाणे दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यातच एल निनोमुळे राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार आहे. कमी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याच्या चर्चेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Pune Crime : सगळ्यांसमोर ‘अंकलजी’ म्हणा, खोलीत ‘महाराज’ बोला! पुण्यातील भोंदूचा पर्दाफाश, 12 हजार चौ फुटांवर आलिशान बंगला, भुयार खोदण्याचा प्रयत्न
‘सरकारने सांगितल्याशिवाय पेरण्या करू नये’, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तरीही राळेगाव, मारेगाव, आर्णी तालुक्यात सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. मात्र जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू असल्याने पावसाची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा कमी झाला आहे. एल निनोमुळे पावसात खंड पडण्याचा अंदाज असल्याने ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणातील पाण्याचा साठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून त्यातील सरासरी पाण्याचा साठा ३४.०९ टक्के आहे. सात मध्यम प्रकल्प असून त्यातील पाण्याचा साठा सरासरी ४३.५३ टक्के आहे. यासोबतच ६३ लघु प्रकल्प असून त्यातील सरासरी पाण्याचा साठा २२.५७ टक्के आहे. जिल्ह्याची सर्व प्रकल्पातील पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ३३. ७० इतकी आहे.
खते, बियाणे महागल्याने बजेट कोलमडले
यंदाच्या हंगामात खते आणि बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. या वाढीव किमतींमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. गेल्या हंगामात आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीनची विक्री केली. आता पेरणीच्या वेळी त्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक नाही. बाजारात गेल्या वर्षी २,८०० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग ३,४०० रुपयांवर पोहचली होती. आता हे दर ४,००० रुपयांवर पोहचले आहेत. दुसरीकडे टंचाईचा धोका टाळण्यासाठी शेतकरी आत्तापासून खत खरेदी करीत आहे. अनुदानित खते मिळत नसल्याने महागडे खते घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मागील वर्षी १,४०० रुपयांना मिळणारे रासायनिक खताची बॅग २,१५० रुपयांवर पोहचली आहे. साधारणत: आठशे ते हजार रुपयांनी खते महागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Pune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट
वर्ध्यात सहा टक्के क्षेत्रावर पेरणी
वर्धा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसला तरी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत सुमारे सहा टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला की, अनेक शेतकरी पेरण्या करतात. धूळपेरणी साधली तर उत्पादनात भर पडते. पण पेरणी उटल्यास दुबारचे संकट निर्माण होते. वर्धा जिल्ह्यात सुमारे चार लाख सात हजार हेक्टरच्या वर खरीप हंगामातील पिकांचे लागवडीखालील क्षेत्र आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकाचे क्षेत्र मोठे असते. सुमारे २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्याचा अंदाज गेल्या वर्षी कृषी विभागाने वर्तविला होता. परंतु कापशीच्या उत्पादनात होत असलेली घट, वाढता उत्पादन खर्च आणि कपाशीला मिळणारा भाव याची तुलना करून यावर्षी शेतकरी तुरीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

