Headlines

काम मागण्यात कमीपणा,संकोच कसला? समाधानावर घर चालत नाही, EMI, बिलं भरावी लागतात; अक्षया नाईकनं दाखवलं इंडस्ट्रीतलं अस्थिर वास्तव


Akshaya Naik On asking For Work: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मलिकेतून लतिका या भूमिकेमुळं अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली. यानंतर ती आणखी काही मालिकांमध्ये झळकली.

Akshaya Naik On asking For Work
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाइम्स टीम
मराठी-हिंदी कलाकृतींमधला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ सुंदरा मनामध्ये भरली ‘, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘तस्करी’, ‘ग्रेटर कलेश’ अशा विविध कलाकृतींमधल्या विविधांगी भूमिकांमधून तिनं स्वतःची वेगळी छाप पाडली. अभिनयासोबतच ‘क्लाऊनिंग’ आणि ‘कलरीपायट्ट’ सारख्या कलाप्रकारांमध्येही ती सक्रिय आहे. मात्र, अभिनयक्षेत्रातील अस्थिर वास्तवाकडे लक्ष वेधत तिनं ‘मुंटा’कडे तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

Maharashtra TimesPriyadarshini Indalkar: हॅरी पॉटर’, ‘बार्बी’, ‘बिग हिरो ६’, ‘फ्रोजन’ सारख्या प्रोजेक्टसाठी प्रियदर्शिनीनं केलंय काम, पहिल्या कमाईबद्दलही केला खुलासा
काम मागण्यात कोणताही कमीपणा नसल्याचं स्पष्टपणे सांगत अक्षयानं कलाकारांच्या आयुष्यातलं वास्तव मांडलं आहे. याबाबत ती म्हणते, ‘अभिनय हे करिअर जितकं झगमगाटानं भरलेलं दिसतं, तितकंच ते अनिश्चिततेनं व्यापलेलंही असतं. प्रायोगिक कलाकृतींमधून अपेक्षित आर्थिक उत्पन्न मिळत नाही. अनेकदा प्रकल्प रखडतात, काही मध्येच बंद होतात, तर काहींचे मानधन वेळेवर मिळत नाही. केवळ सर्जनशील समाधानावर घर चालत नाही, बिलं आणि ईएमआयही भरावे लागतात. सोशल मीडियावर मी सातत्यानं सक्रिय असल्यामुळे अनेकांना मी खूप व्यग्र असल्याचं वाटतं; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती तशी नसते. माझ्या शरीरयष्टीमुळे आजही काही भूमिका आणि संधी मर्यादित होतात असं मला वाटतं, किंवा कदाचित मी अद्याप योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही.’

पाय फ्रॅक्चर असतानाही अक्षया करतेय शूटिंग

अक्षयानं सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट कामाची मागणी करत आपली भूमिका मांडली आहे. ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक जसे नोकरीच्या संधी शोधण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात, तसे कलाकारांनीही काम शोधताना संकोच बाळगू नये. माझ्याकडे चांगलं आणि वैविध्यपूर्ण काम करण्याची क्षमता आहे. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारीही आहे. मला फक्त योग्य संधी आणि योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे’, असं म्हणत तिनं निर्माते, दिग्दर्शक आणि कास्टिंग दिग्दर्शकांना आवाहन केलं आहे. तिच्या या प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं असून कलाकारांच्या संघर्षाविषयी नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.

अक्षया नाईक

Maharashtra TimesArbaz Shaikh : मला माझ्या बापाला वाचवायचंय,अरबाज शेखचे अश्रू अनावर; हॉस्पिटलवर गंभीर आरोप, आर्थिक मदतीचीही विनंती

ओटीटीवरील कामाचं कौतुक
अक्षया’तस्करी’ या वेह सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमितेक झळकली होती. या सीरिजमध्ये तिनं अभिनेता इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर केली. या सीरिजमधील तिच्या कामाचं कौतुक झालं होतं.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा