Kajol Birthday Special : अभिनेत्री काजोलची लव्हस्टोरी अगदी भन्नाट होती. त्यांचे लग्न इतके गुप्त ठेवण्यात आले की फोटोग्राफर सुद्धा बोलावला नव्हता. अभिनेत्रीच्या वडिलांना जावई पसंत नव्हता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री काजोल आज आपला 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलची पार्श्वभूमी ही फिल्मीच आहे. तिची आई, तनुजा, या एके काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तिचे वडील, शोमू मुखर्जी हे एक चित्रपट दिग्दर्शक होते. वयाच्या 16 व्या वर्षी काजोलने 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
काजोल आणि अजय देवगण यांची लव्हस्टोरी ही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी रंजक आहे. ते दोघे एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते. एकीकडे काजोल तिच्या उत्साही स्वभावासाठी ओळखली जाते, तर दुसरीकडे अजयला मितभाषी राहायला आवडते. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लग्नाची स्टोरी जाणून घेऊ.
काजोल आणि अजयने चार वर्षे एकमेकांना डेट केले
काजोल आणि अजय देवगण यांची पहिली भेट ‘हलचल’च्या सेटवर झाली. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दिव्या भारतीच्या निधनानंतर काजोलला ही भूमिका मिळाली होती. काजोल आणि अजय दोघे चार वर्षे एकमेकांना डेट करत होते, पण त्यांचे नाते मीडियापासून ते चाहत्यांपर्यंत कोणालाही माहीत नव्हते. खरेतर हे नाते सुरू व्हायच्या आधी ते दोघे वेगवेगळ्या माणसांना डेट करत होते. पण सिनेमांमध्ये काम करताना त्यांच्यात मैत्री झाली अन् हळूहळू प्रेम फुलत गेले.
आपल्या प्रेमकथेबद्दल बोलताना काजोल एकदा म्हणाली होती की, “आमचं लग्न व्हावं असं कुणालाही वाटत नव्हतं. आमची कुटुंबं एकमेकांपेक्षा खूप वेगळी होती. जेव्हा मी माझ्या वडिलांशी अजयशी लग्न करण्याबद्दल बोलले, तेव्हा ते आठवडाभर माझ्याशी बोलले नाहीत. त्यांनी मला विचारलं, ‘तुझं करिअर इतकं चांगलं चाललं असताना, तुला इतक्या लवकर लग्न का करायचं आहे?’ पण मी लग्न करण्यावर ठाम होते. मी आणि अजय एकमेकांपेक्षा खूप वेगळे होतो, त्यामुळे त्यांना वाटलं की आमचं नातं चांगलं जमणार नाही, फार काळ टिकणार नाही.”
सासूलाही आवडत नव्हती काजोल?
हे जोडपे आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत असतानाच, बॉलिवूडमध्ये अशी चर्चा रंगली होती की काजोल आणि तिच्या सासूमध्ये खटके उडत होते. वीणा देवगण यांना काजोल आवडत नसे, असे म्हटले जात होते. मात्र, नंतर एका मुलाखतीत काजोलने या अफवांना पूर्णविराम देत त्या निराधार असल्याचे स्पष्ट केले.
काजोल आणि अजय देवगण 2001 मध्ये आई बाबा होणार असल्याचे समजले होते. मात्र, पालक बनण्याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच एका दुर्दैवी घटनेने त्यांचा आनंद हिरावून घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांची गरोदर असताना काजोलचा गर्भपात झाला. या घटनेमुळे अजय देवगण आणि काजोल यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा आल्याच्या अफवांनाही उधाण आले होते.
२००३ मध्ये काजोलच्या आयुष्यात पुन्हा एकदा मातृत्वाचा आनंद आला.
गर्भपातामुळे खचून गेलेल्या काजोलच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला. दोन वर्षांनंतर, तिला आणि अजय देवगणला अपत्यप्राप्ती झाली. 20 एप्रिल 2003 रोजी या जोडप्याला मुलगी नीसा देवगण झाली. सात वर्षांनंतर, 13 सप्टेंबर 2010 रोजी त्यांचा मुलगा युग देवगण जन्मला. आजही काजोल आणि अजय देवगण ही बॉलिवूडमधील एक खूप लोकप्रिय जोडी आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा