Headlines

आयआयटी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन; वसतिगृहात खळबळ, कारण अस्पष्ट


IIT Mumbai Student Ends Life: आयआयटी मुंबईच्या परिसरात यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची ही दुसरी घटना असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.

iit mumbai
आयआयटी मुंबई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : आयआयटी मुंबईत दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री वसतिगृहात गळफास घेऊन जीवन संपवलं. या विद्यार्थ्याने मटेरियअल सायन्स इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला होता. या विद्यार्थ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून राजस्थानमधील त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पवई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Maharashtra TimesMumbai Crime : आठ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर अमानूष अत्याचार, चेंबूरमध्ये विकृत मानसिकतेचं भयावह रुप; जगण्याची शाश्वती कमी
आयआयटी मुंबईच्या वसतिगृह क्रमांक चारमध्ये राहणारा सोहिल संगवान (२०) हा विद्यार्थी मटेरियल सायन्स इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. मूळचा राजस्थानमधील पिलानी येथे राहणारा सोहिल चारच दिवसांपूर्वी घरून संस्थेत परतला होता. मंगळवारी रात्री त्याच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला जात नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी संस्था प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून खोली उघडली असता, सोहिलने गळफास घेतल्याचे आढळले.

याबाबत प्रशासनाने पवई पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केल्यावर पवई पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३मधील कलम १९४नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली. विद्यार्थ्याने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आढळलेली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra TimesKishori Pednekar: जेन झींना गटार म्हणणारी कंगना नालायक, नेत्यांनी तिला आवरायला हवं; भाजप खासदारावर भडकल्या किशोरी पेडणेकर
पोलिसांनी सोहिलच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यावर छत्तीसगड येथे राहणारे त्याचे मामा राजिंदर रात्रीच मुंबईत पोहोचले. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी रात्री वसतिगृह क्रमांक चारमधील अनेक विद्यार्थी इमारतीबाहेर जमा झाले. विद्यार्थ्यांनी या घटनेबाबत संस्थेच्या प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

यापूर्वी फेब्रुवारीमध्येही आयआयटी मुंबईतील दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध समुपदेशन आणि मानसिक आरोग्यविषयक सुविधांची माहिती पुन्हा दिली होती. तणाव किंवा भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक समुपदेशनासह उपलब्ध मदत यंत्रणांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा