Headlines

नेपाळी पीएम संसद, राष्ट्रपतींना मोजेनात; सोशल मीडियावरून चालवतात सरकार!:डिजिटल राजकारण, घटनात्मक संस्थांना डावलल्याने शाहांवर टीका


  • Marathi News
  • International
  • Nepali PM Does Not Respect Parliament, President; Runs Government Through Social Media!, Criticizes Shah For Ignoring Digital Politics, Constitutional Institutions

काठमांडू1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

नेपाळच्या सत्तेच्या शिखरावर सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या लोकप्रियतेच्या बळावर पोहोचलेल्या बालेन शाह सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांच्या आतच संसद, घटनात्मक संस्थांना डावलल्याचा आरोप केला जात आहे.

नेपाळी संविधानातील कलम ८१ नुसार पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना राज्याच्या कारभाराविषयी माहिती देणे गरजेचे असते. शाह यांनी चार महिन्यांत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याशी एकही धोरणात्मक बैठक घेतली नाही. अध्यादेशावर चर्चेचेआमंत्रणही फेटाळून लावले.

तसेच, आरोग्य, शिक्षणावर ३% कराची घोषणा कॅबिनेटची औपचारिक मान्यता मिळण्याच्या एक दिवस आधीच पंतप्रधानांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून केली होती. सरकारचे दोष उघड करणाऱ्यांविरुद्ध आता डिजिटल शस्त्र वापरले जात आहे.

परराष्ट्र धोरणावर १३६ दिवसांनंतर यू-टर्न; भारतीय राजदूतांशी पहिली औपचारिक भेट,

शाह यांनी सोमवारी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि चीनचे राजदूत झांग माओमिंग यांची सिंहदरबार येथील पंतप्रधान कार्यालयात वेगवेगळी भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर १३६ दिवसांनी कोणत्याही परदेशी राजदूतासोबतची ही त्यांची पहिली औपचारिक वन-टू-वन बैठक होती.

पंतप्रधान शाह यांनी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांच्या भेटीदरम्यान भारतासोबत नेपाळचे ऐतिहासिक संबंध आणखी मजबूत करण्यावर आणि सामायिक हिताच्या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्यावर भर दिला. यानंतर दुपारी चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी पंतप्रधान शाह यांची भेट घेऊन चर्चा केली.

अमेरिकन दूतांशी भेटण्यास दिला होता नकार, राजनैतिक दबाव; प्रादेशिक प्राधान्यक्रम लक्षात घेता आता बदल

यापूर्वी बालेन शाह यांनी बंद दाराआड परदेशी दूतांना एकट्याने भेटणे टाळण्याचा नियम केला होता. याच धोरणाअंतर्गत त्यांनी अमेरिकेचे सहायक परराष्ट्र मंत्री आणि ट्रम्प प्रशासनाच्या विशेष दूतांना भेटण्यासही नकार दिला होता. मात्र, राजनैतिक दबाव आणि प्रादेशिक प्राधान्यक्रम लक्षात घेता आता त्यांनी या धोरणात बदल केला आहे. मंगळवारी त्यांची अमेरिकन दूतावासाच्या कार्यवाह राजदूतांशीही भेट होण्याचा कार्यक्रम आहे.

भारताच्या उच्चायुक्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट

ढाका | बांगलादेशची राजधानी ढाका येथे भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी पंतप्रधान तारिक रहमान यांची पहिली औपचारिक भेट घेतली. बैठकीत रहमान यांनी शेख हसीना यांचा मुद्दाही उपस्थित केला. त्रिवेदींना कॅबिनेट दर्जा आहे.

दरम्यान, भारताच्या गुप्तचर संस्था ‘रॉ’चे प्रमुख पराग जैन ४ सदस्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ढाका येथे पोहोचले आहेत. मात्र, याविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत