![]()
शेकडो वर्षांपासून लाखो भाविक तिरुपतीला भगवान श्री वेंकटेश्वरांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. मात्र, जगातील सर्व सुख-सुविधा ज्यांच्या एका इशाऱ्यावर हजर होऊ शकतात, अशा प्रतिष्ठित अंबानी कुटुंबातील अनंत अंबानी जेव्हा आपले सर्व वैभव बाजूला सारून देवाच्या चरणी लीन होतात, तेव्हा त्या समर्पणाचे मोल कैक पटीने वाढते. केशदान ही केवळ एक परंपरा नाही, तर तो आपल्या सौंदर्याचा आणि अहंकाराचा केलेला स्वेच्छा त्याग आहे. आजच्या या झगमगत्या ग्लॅमरस जगात, तरुण वयात स्वतःच्या रूपाचा आणि केसांचा असा त्याग करणे अत्यंत कठीण असते; मात्र अनंत यांनी ही गोष्ट अत्यंत सहजतेने, नम्रतेने आणि निस्सीम भक्तीभावाने करून दाखवली.
अथांग वैभव हाताशी असताना, तरुण वयात रूप आणि अहंकाराचा असा विलोभनीय त्याग करणे साधेसुधे नाही. हा केवळ भक्तीचा भाग नाही, तर अनंत अंबानी यांनी देवाप्रती दाखवलेली पराकोटीची शरणागती आणि समर्पण आहे.
अनंत अंबानी यांचा आजवरचा जीवनप्रवास अनेक मोठ्या आव्हानांनी आणि संघर्षाने भरलेला राहिला आहे. बालपणापासूनच्या आरोग्याच्या समस्या या सर्वांचा त्यांनी अत्यंत धैर्याने सामना केला.या सर्व संघर्षातून जात असताना त्यांनी आपला देवावरचा विश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या कौटुंबिक साम्राज्याची जबाबदारी सांभाळत असताना,त्यांनी स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे वाहून घेतले आहे.
हा त्याग यासाठीही मोठा आहे कारण भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सदस्य असूनही, त्यांनी कोणतीही VIP प्रतिष्ठा न मिरवता, इतर सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच या कठीण परंपरेचे पालन केले. आजच्या काळात, जिथे तरुण पिढी भौतिक सुखांमागे धावते आहे, तिथे अनंत अंबानी यांनी एवढ्या कमी वयात दाखवलेली ही परिपक्वता,नम्रता आणि भक्ती खरोखरच कौतुकास्पद आहे.
त्यांच्या या कृतीतून हेच सिद्ध होते की, संपत्ती आणि प्रसिद्धी कितीही मोठी असली,तरी देवाच्या दरबारात खरी भक्ती आणि त्यागच श्रेष्ठ ठरतो. अनंत अंबानी यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या मनातील निस्सीम भक्ती आणि त्यांनी आयुष्यात केलेल्या मोठ्या त्यागाची साक्ष देतो.
केशदान ही परंपरा नक्की आहे तरी काय?
केशदान ज्याला दक्षिण भारतात प्रामुख्याने ‘कल्याण कट्टा’ असेही म्हटले जाते ही हिंदू धर्मातील, विशेषतः तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरात पाळली जाणारी एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन परंपरा आहे. यामध्ये भाविक देवाप्रती आपली कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण केस मुंडण करून देवाच्या चरणी अर्पण करतात.
वैज्ञानिक आणि सामाजिक बाजू
केशदान केल्यावर श्रीमंत गरीब, उच्च नीच हा भेद संपतो. मुंडण केल्यावर प्रत्येक व्यक्ती सारखीच दिसते,ज्यामुळे मंदिरात समानतेची भावना निर्माण होते.
