![]()
मनपाच्या सर्वसाधारण सभेत अदानी समूहाच्या ‘सीएनजी’ स्टेशनसाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर तब्बल पावणे दोन तास ‘खल’ झाला. प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट सभागृहासमोर विषय आणल्याचा आरोप करत विरोधी पक्षांसह सत्ताधारी शहर सुधार आघाडीतील नगरसेवकांनीही सुरुवातीला आक्षेप नोंदवला. अखेर मतदान घेण्यात आले व ४७ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने, तर २२ नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्याने ठराव मंजूर झाला. अदानी समूहाच्या ‘सीएनजी’ स्टेशनसाठी दक्षता नगरातील जागा देण्याच्या िवषयाला सुरुवातीलाच शहर सुधार आघाडीचे स्वीकृत नगरसेवक सुनील मेश्राम यांनी स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते डॉ. जीशान हुसेन, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नीलेश देव, नगरसेवक पराग गवई तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला. विरोधकांनी शहरातील कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेली महापालिकेची जागा अदानी समूहाला देण्यास विरोध दर्शवत, हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप केला. देशात चार सरकारी कंपन्या सीएनजी गॅस पुरवठा करत असताना अदानी समूहालाच जागा उपलब्ध करून देण्याची घाई काॽ, असा सवाल डॉ. जीशान हुसेन यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाकडून मालमत्ता विभागाचे प्रमुख संदीप गावंडे यांनी स्पष्टीकरण देताना, ‘सीएनजी’ स्टेशनसाठी केवळ २७० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. सभापतींनी मांडला ठराव स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी विरोधकांनी या विषयाचे राजकारण करू नये, असे म्हणत ठराव मांडला. विरोधकांनी मतदान घेण्याची मागणी लावून धरली. महापौर शारदा खेडकर यांनी मतदान घेण्याचे निर्देश िदले.
Source link
‘अदानी’ समुहाच्या ‘सीएनजी’ केंद्रासाठी दक्षतानगरात जागा:मंजुरीवरुन पावणेदोन तास ‘खल’; मतदानाने ठराव मंजूर
