Headlines

ZP school girl student from small community in pune achieves educational success; झोपडीतील अंधार चिरून शिक्षणाचा लखलखाट; पुण्यात नंदीबैल समाजातील सुवर्णाची ‘सुवर्ण’झेप


पुणे : ​दारिद्र्य, हालअपेष्टा आणि अंधार… या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावाबाहेरच्या एका छोट्याशा झोपडीकडे पाहावे लागेल. ओढ्यालगत असलेल्या या झोपडीत ना पुरेशी वीज आहे, ना ऊन-पावसापासून वाचवणारे भक्कम छत. पण याच अंधाऱ्या झोपडीतून एका चिमुकलीने आपल्या जिद्दीच्या प्रकाशाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे नाव आहे सुवर्णा बबन आव्हाट. ​चांडोली बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणाऱ्या सुवर्णाने शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातून अकरावा क्रमांक पटकावत, आपल्या नावाला साजेशी ‘सुवर्ण कामगिरी’ केली आहे.

​मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथील असलेले आव्हाट कुटुंब गेल्या ३५ वर्षांपासून चांडोली बुद्रुक येथे वास्तव्यास आहे. सुवर्णाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून पोटाची खळगी भरतात. वडिलांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, तर आईचे सहावीपर्यंत झालेले. पोटाचा प्रश्न सोडवतानाच नाकीनऊ येत असतानाही, या दाम्पत्याने आपल्या लेकीच्या शिक्षणाची दोर मात्र कधीच सैल पडू दिली नाही. ​भटक्या नंदीबैल समाजातील मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे तसे बंदच असतात. त्यातच घरात अठराविश्वे दारिद्र्य. घरात अनेकदा वीज नसते. पण उन्हाचे चटके आणि पावसाच्या धारा झेलत सुवर्णाची अभ्यासाची जिद्द कधीच विझली नाही.

​सुवर्णाच्या शिक्षिका, दिपा दत्ता गोरडे सांगतात की, “सुवर्णा अतिशय शांत, नम्र आणि प्रामाणिक आहे.” परिस्थिती कितीही बिकट असली तरी तिच्या चेहऱ्यावरील शिकण्याची ओढ कधीच कमी होत नाही. कधी-कधी तर सुवर्णाकडे डबाही नसतो, पण अशा वेळी तिच्या मैत्रिणी आपल्या डब्यातील घास तिच्यासोबत प्रेमाने वाटून खातात. हा नुसता घास नसून, तिच्या ध्येयाला बळ देणारी माणुसकीची एक सुंदर किनार आहे. गावकरीही आता या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

​प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून सुवर्णाने मिळवलेले हे यश केवळ आकडेवारी नाही, तर तिच्या अथक मेहनतीचे फळ आहे. सुवर्णाने ​२०२६ मध्ये झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत २५६ गुण मिळवत पुणे जिल्ह्यात ११ वा क्रमांक मिळवलाय. तरं ​NSSE राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये २०० पैकी १८६ गुण, संपूर्ण राज्यात ५ वा क्रमांक पटकवलाय. इतकंच नाही तर ​राज्यस्तरीय अभिरूप परीक्षेमध्ये ३०० पैकी २६६ गुण मिळवत जिल्ह्यात ४ था क्रमांक मिळवलाय.

​सुवर्णाची आई, शारदा आव्हाट यांचे डोळे लेकीच्या यशाने पाणावले आहेत. अत्यंत भावुक होत त्या म्हणतात, ​”मी फक्त सहावीपर्यंत शिकले. आमच्या नंदीबैल समाजात मुलींना पुढे शिकवण्याची तशी प्रथाच नव्हती. पण माझ्या मुलीने तसं राहू नये. तिने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, एवढीच माझी एकुलती एक इच्छा आहे.”​ आईच्या या शब्दांत एका पिढीचा संघर्ष आणि दुसऱ्या पिढीसाठी पाहिलेलं एक सुंदर स्वप्न दडलेलं आहे.

​दरम्यान, वंचित आणि उपेक्षित समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आज किती मोठे योगदान देत आहेत, याचे सुवर्णा हे एक जिवंत उदाहरण आहे. सुवर्णाला शासकीय योजनांमधून काही प्रमाणात मदत नक्कीच मिळेल, पण तिचे हे यशाचे पंख असेच आकाशात झेपावत राहावेत, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची नितांत गरज आहे. ​एक झोपडी आज प्रकाशाने उजळून निघाली आहे, आता जबाबदारी आपली आहे की या प्रकाशाला कधीही विझू न देण्याची!

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत