Headlines

Yavatmal Pusad ATS Conducts Major Operation; यवतमाळमध्ये ‘एटीएसचे’ छापे, घातपाताच्या कटाच्या संशयावरुन मोठी कारवाई; महाराष्ट्रात खळबळ


Yavatmal ATS News : राज्यात खळबळ उडवणारी बातमी यवतमाळमधून समोर आली आहे. यवतमाळमध्ये एटीएसने कारवाई केली आहे. पोलिसांकडून काही संशयितांच्या घरी तपास सुरु आहे.

Yavatmal ATS News
पुसद एटीएसची कारवाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ : राज्यात घातपाती कारवाया घडविण्याचा कट रचला जात असल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात मोठी कारवाई सुरु केली. पुसद आणि उमरखेड शहरांत 20 एटीएस पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवायांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. उमरखेड येथील ताजपुरा वॉर्ड परिसरातील एका संशयिताच्या घराची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएस पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपासणी केली. स्थानिक पोलीस विभागही या कारवायांपासून अनभिज्ञ होते. केवळ बंदोबस्त हा स्थानिक पोलिसांचा होता. कारवाई काय झाली हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.

संशयिताच्या घरी तपास सुरु

मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ताजपुरा वॉर्डातील एका घराजवळ पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली. काही वेळाने नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली. पोलिसांनी एका संशयिताच्या घरी तपास सुरु करताच सदर तपासणी दहशतवादीविरोधी पथकाची असल्याचे समजले. रविवारी सकाळपर्यंत सदर पथकाची चौकशी सुरु होती.
Maharashtra TimesSunetra Pawar : अजित पवार गेले, पण तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका; सुनेत्रा पवारांची भावनिक साद, दादांचं स्वप्न…

तरुणांच्या ‘ब्रेनवॉशिंग’चा संशय

पुसद शहरातही एटीएसच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली आहे. शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पार्वतीनगर परिसरातील तरुणाचा ‘ब्रेनवॉशिंग’ करुण राज्यात घातपाती कारवाया घडवण्याचा कट रचल्याच्या संशयावरुन एटीएसने शनिवारी मध्यरात्रीपासून धडक कारवाई केल्याने शहरात एकच कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातील तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करुन त्यांना दहशतवादी संघटनांकडे आकर्षित केले जात असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या आधारे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वातील विशेष पथकांनी शनिवारी मध्यरात्री पुसद शहरात 11 ठिकाणी शोधमोहीम राबविली. यात डझनाहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही मोहीम अत्यंत गोपनीय ठेवल्याने या कारवायांची स्थानिक पोलिसांनाही कल्पना नव्हती. कारावाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
Maharashtra TimesNashik Crime: परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा विनयभंग; नाशकात रोडरोमियोचा संतापजनक प्रकार, भररस्त्यात छेडछाड

संशतियांच्या संबंधांचा तपास सुरु

राज्यातील तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून त्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करीत त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. संशयितांचे काही आंतरराष्ट्रीय किंवा आंरराज्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का? याचाही तपास सुरु आहे. जप्त लॅपटॉप आणि मोबाइलमधून मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. एटीएसने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. अद्याप कुणालाही रीतसर अटक केलेली नाही. आक्षेपार्ह साहित्य आणि तांत्रिक पुराव्यांआधारे पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा