Headlines

Yavatmal Pandharkawada Father Died Accident While Going to See New Born Son; लेकरु झाल्याचा आनंद, अख्ख्या गावाला बातमी, बाळाला बघायला जाताना अनर्थ; वाटेतच बापाचा मृत्यू


Yavatmal Accident News : यवतमाळ जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या बाळाला पाहण्यासाठी जाताना बापाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Pandharkawada accident father dies
पांढरकवडा अपघात वडिलांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : पत्नीची प्रसूती झाल्याने तिच्यासह नवजात बाळाला पाहण्यासाठी जात असताना दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली. या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

श्रीकांत नागोराव रामगडे (३६) रा. भिसनी असे मृताचे नाव आहे. पांढरकवडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भिसनी येथील श्रीकांत यांची पत्नीला प्रसूतीसाठी पांढरकवड्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. याविषयीची माहिती मिळताच श्रीकांत हे आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन पांढरकवडा येथे निघाले. सोमवारी सायंकाळ झाली असल्याने अंधार पसरला होता. वाटेत ट्रॅक्टर उभा असताना दिसून आला नाही. परिणामी श्रीकांत यांची दुचाकी त्यावर धडकली. या अपघातात श्रीकांत यांच्या डोक्याला जबर मार लागला. मुलगाही जखमी झाला. हे पाहताच नागरिक धावून आले. त्यांनी बापलेकांना पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच श्रीकांत यांचा मृत्यू झाला होता. पांढरकवडा पोलिसांनी ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra TimesPranita Rasam : शूटिंग संपवून मायलेकी निघाल्या, मराठी मालिकेतील बालकलाकाराच्या आईचा भांडुप अपघातात मृत्यू, पूर्वाच्या डोळ्यासमोर…

आनंदाचे क्षण दु:खात बदलले

श्रीकांत यांना मुलगा झाल्याचे कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. गावातील साऱ्यांना ही आनंदवार्ता दिली. घरातील नव्या पाहुण्याला पाहण्याची ओढ वाढू लागली. सायंकाळ झाली असतानाही त्यांनी दुचाकीने पांढरकवड्याच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत उभ्या ट्रॅक्टरने घात केला. दुचाकी त्यावर धडकली आणि श्रीकांत यांचा मृत्यू झाला. आनंद ओसंडून वाहणाऱ्या घरात दु:ख पसरले.

मंदिरात नवजात बाळाचा मृतदेह, नरबळीची चर्चा

तुमसर तालुक्यातील राजापूर-नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मातेच्या मंदिरात एका नवजात बाळाचा मृतदेह मंगळवारी आढळला. हा प्रकार नरबळीचा असल्याची चर्चा वाढल्याने खळबळ उडाली आहे. गोबरवाही पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
Maharashtra TimesBhandup Bus Accident: मानसीने 20 वर्षे रुग्णांची केली सेवा, वर्षा उद्याच रुजू होणार होती; पण भांडूपमधील ‘ती’ रात्र दोघींसाठी काळ ठरली

लक्ष्मीकांत गोपाले हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी पाच वाजता मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेले असता, त्यांना माता मंदिरात कापडात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत चिमुकला आढळला. चिमुकला मृत असल्याचे लक्षात येताच याची माहिती त्यांनी पोलिस पाटील दिवाकर डोंगरे यांना दिली. पोलिसांनी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. हे नवजात बळ मृत अवस्थेत मंदिरात आढळल्याने नरबळीची चर्चा वाढली आहे. अधिक तपास गोबरवाहीचे पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गिते करीत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा