Headlines

Yavatmal Borgaon Terrible Accident One Person Including Couple Dies on the Spot; वाहनात बिघाड झाल्यानं रस्त्याच्या कडेला थांबले, तिथेच काळ आडवा, भरधाव ट्रकने चिरडलं; दाम्पत्यासह तिघांचा अंत


Yavatmal Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दाम्पत्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Yavatmal Accident News
यवतमाळ अपघात बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : वाहनात बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात एका दाम्पत्यासह तिघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. दिवाळीच्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू परिसरातील पैलपाडा गावाजवळ हा भीषण अपघात घडला.

बोरगाव मंजू येथील धीरज शाळीग्राम सिरसाठ (वय 35) आणि त्यांची पत्नी अश्विनी (वय 30) हे दोघेही दुकानाचे सामान घेऊन ‘छोटा हत्ती’ने मंगळवारी रात्री कारंजा तालुक्यातील खेर्डा येथे जात होते. पैलपाडा गावाजवळ त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने गावाकडे परत जाण्यासाठी त्यांनी दुसरे वाहन बोलविले. आरिफ खान अहमद खान (वय 28) व अन्वर खान अब्दुल खान (वय 25) हे दोघेही तातडीने वाहन घेऊन पैलपाडा गावाजवळ पोहोचले. यानंतर चौघेही नादुरुस्त वाहनाची पाहणी करीत रस्त्याच्या कडेला उभे असताना मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली.

Maharashtra Timesआईचा आक्रोश, बिबट्याची माघार; शेपटी पकडली अन् लेकरासाठी ‘ती’ बिबट्याशी भिडली! नेमकं काय घडलं?

या भीषण अपघातात धीरज, अश्विनी व आरिफ खान यांचा जागीच मृत्यू तर अन्वर खान हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून महामार्गावरील सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे सोमवारी समोर आले. कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यातील या घटनांमुळे शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra TimesVasai Fort Video : शिवरायांच्या पोशाखात आलेल्या तरुणाला हटकलं, हिंदी सुरक्षा रक्षकाचं कृत्य, ‘हिंदीतून बोला’ म्हणत माज, युवकाने काय केलं?

कळंब तालुक्यातील तिरझडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष वसंत ठुसे (३५) यांनी १८ ऑक्टोबरला सायंकाळी गावातीलच ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांच्या शेतातील सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढत असल्याने ते सतत काळजीत राहत होते. यातच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा