Headlines

womens t20 world cup indw vs banw bangladesh win toss and bat first renuka singh thakur; बांगलादेशचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, हरमनप्रीतनेही काढला हुकमी एक्का, टीम इंडियाची मोठी परिक्षा


T-20 World Cup 2026, IND W vs BAN W: महिला टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय महिला संघासमोर बांगलादेशचे महत्त्वाचे आव्हान उभे ठाकले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, टॉस जिंकलेल्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

india women vs bangladesh women
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: महिला टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले असून प्रत्येकी एक पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघासाठी ही लढत अधिक निर्णायक मानली जात आहे. या सामन्यात हरमनने रेणुका सिंग ठाकूरचाही प्लेइंग ११ मध्ये समावेश केला आहे. सेमीफायनलचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

टॉस जिंकत बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय

सामन्यात बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय गोलंदाज सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येत रोखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. तर प्रत्येकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा बनला आहे. भारताला मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ विजयाच्या मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात आहे.

बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावला

बांगलादेशने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. मात्र पाकिस्तानला नमवत संघाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे भारतीय संघासमोर बांगलादेशचे आव्हान हलके घेण्यासारखे नाही. विशेष म्हणजे या सामन्यासाठी बांगलादेशने आपल्या अंतिम अकरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघावरच त्यांनी विश्वास कायम ठेवला आहे.

Maharashtra TimesIND W vs BAN W : …तर मग वर्ल्ड कप विसराच! महिला भारतीय संघाच्या दोन पडत्या बाजू समोर, नेमक्या कोणत्या?

भारताची प्लेइंग इलेव्हन

स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि नंदनी शर्मा.

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन

दिलारा अक्तर, जुएरिया फिरदोस, शर्मीन अख्तर, निगार सुल्ताना (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शोभना मोस्तरी, रितू मोनी, शोर्ना अक्तर, राबेया खान, नाहिदा अक्तर, शांजिदा अक्तर मेघला आणि मारुफा अक्तर.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा