Who Is in the Greatest Danger This Viral Brain Teaser Has the Internet Thinking | A की D दोघांपैकी कोणाचे प्राण आहेत धोक्यात? चित्र नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या
Who Is in the Greatest Danger This Viral Brain Teaser Has the Internet Thinking | A की D दोघांपैकी कोणाचे प्राण आहेत धोक्यात? चित्र नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या
Viral Riddle: तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. हे चारही पर्याय नीट पाहा आणि सांगा चौघांपैकी कोण जास्त धोक्यामध्ये आहे?
(फोटो सौजन्य – aakverse.__/Instagram)
तुमच्यासमोर चार माणसं आहेत. आणि ही चारही जणं अत्यंत धोकादायक परिस्थितीत अडकली आहेत.
A – हा व्यक्ती आगीमध्ये अडकला आहे. B – या व्यक्तीच्या खोलीमध्ये पाणी भरलेलं दिसत आहे. C – या व्यक्तीच्या खोलीमध्ये वाघ आहे. D – या व्यक्तीच्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झालेलं दिसत आहे.
तर कोडं असं आहे. हे चारही पर्याय नीट पाहा आणि सांगा, चौघांपैकी कोणाचे प्राण सर्वाधिक धोक्यात आहेत? पाहूया, कोण देतं योग्य उत्तर?
काय असेल उत्तर?
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला या परिस्थितीचा नीट बारकाईने विचार करावा लागेल. प्रत्येक खोलीतील नेमका धोका काय आहे? आणि त्या धोक्यातून वाचण्याचा पर्याय काय असू शकतो? याचा विचार केल्यावरच तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल.
० ० ० ० ०
बराच वेळ विचार करूनही तुम्हाला उत्तर देता आलं नाही का? तर मग खाली दिलेलं स्पष्टीकरण पाहा.
उत्तर आहे – C
C हे उत्तर कसं आलं? ते समजून घेण्यासाठी प्रत्येक खोलीकडे नीट पाहूया.
A – या खोलीमध्ये आग लागली आहे. पण हा तरुण खिडकीवर लटकला, तर काही काळ आगीपासून स्वतःचा बचाव करू शकतो.
B – या खोलीत पाणी छातीपर्यंत भरलेलं आहे. त्यामुळे तो व्यक्ती पाण्यात उभा राहून काही काळ सुरक्षित राहू शकतो.
D – खोलीमध्ये शॉर्टसर्किट झालेलं दिसत आहे. मात्र, विजेचा कंट्रोल बॉक्स खोलीतच आहे. त्यामुळे वीजपुरवठा बंद करून तो स्वतःचा बचाव करू शकतो.
C – मात्र, या खोलीत वाघ आहे. त्याने हल्ला केला, तर वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. खिडकीवर लटकण्याचा प्रयत्न केला, तरी वाघ हल्ला करू शकतो. त्यामुळे सर्वाधिक धोक्यात असलेला व्यक्ती म्हणजे C.
तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं असेल, तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
(फोटो सौजन्य – aakverse.__/Instagram)
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा