Welcome To The Jungle Box Office Collection : अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाच्या कमाईबद्दल जाणून घेऊया.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘ वेलकम टू द जंगल ‘ या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. सिनेमाच्या कमाईबद्दल जाणून घेऊया.
‘वेलकम टू द जंगल’च्या उर्वरित दिवसांबद्दल बोलायचं झाल्यास, सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं पेड प्रिव्ह्यूजसह पहिल्याच दिवशी १९ कोटी कमावले आहेत. चित्रपटानं आता पहिल्या आठवड्यात ९३.१५ कोटी कमावले आहेत. इतकंच नाही, तर या चित्रपटानं आठव्या दिवशी ४.५ कोटी आणि नवव्या दिवशी ७.५ कोटी कमावले.
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
‘वेलकम टू द जंगल’ने प्रदर्शनाच्या पहिल्या १० दिवसांत ११४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यामुळे हा चित्रपट या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता या यादीत तिसरं स्थान मिळवण्याच्या तयारीत हा सिनेमा आहे. मात्र, हे साध्य करण्यासाठी त्याला अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’च्या १९९.३ कोटी कमाईला मागे टाकावं लागेल. त्यामुळे ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Dnyanada Ramtirthkar : पहिल्याच ऑडिशनला निवड, पण अचानक रिप्लेस केलं; ज्ञानदा रामतीर्थकरनं सांगितला इंडस्ट्रीतील अनुभव
‘वेलकम टू द जंगल’ बद्दल
‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या हिट फ्रँचायझीचा सिक्वेल आहे. त्याचा दुसरा भाग, २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिले दोन सिक्वेलसुद्धा हिट ठरले होते. आता, तिसरा सिक्वेलमध्ये अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टी, दिशा पाटनी, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, रविना टंडन आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा