क्रेडिट कार्ड हे उत्पन्न नाही तसेच त्यातून खर्च होणारी रक्कम आपल्या मालकीची नसते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेली प्रत्येक रक्कम आपल्याला व्याजासहित परत करावी लागते. जर क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे तुमच्या डोक्यावरचे कर्ज वाढले आहे तर अशावेळी मुळीच घाबरून जाऊ नका. काही पद्धतींच्या माध्यमातून या परिस्थितितून बाहेर पडता येऊ शकते.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च केलेले पैसे वेळेवर परत केले नाहीत तर याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. खराब क्रेडिट स्कोअरमुळे खाते डिफॉल्ट होण्याची शक्यता असते. पण महिन्याचे संपूर्ण बिल भरण्याऐवजी त्यावर आकरण्यात येणारी मिनीमम डयू जरी भरली तरी खाते डिफॉल्ट होण्याची प्रक्रिया लांबणीवर ढकलता येते. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या बहुतेकांमध्ये खाते डिफॉल्ट होण्यापासून वाचवण्यासाठी दर महिना फक्त मिनीमम डयू भरण्याची पद्धत वापरली जाते.
मिनीमम डयू भरणे हा पर्याय नाही. ही पद्धत खातेदाराला कर्जाच्या चक्रामधून कधीच बाहेर पडू देणारी नाही. मिनीमम डयू जरी भरण्यात आले तरी बँकेकडून उर्वरित कर्जावर आकरण्यात येणारे व्याज काही थांबत नाही. त्यामुळे देय रक्कम वाढतच जाते. परिणामी, खातेदारावर कर्ज वाढत जातो.
क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे डोक्यावर कर्ज वाढत चाललंय?
क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची एक ठराविक मुदत बँकेकडून देण्यात येते. त्या मुदतीत बिल भरला गेला नाही तर लेट फी तसेच वाढत्या व्याजाचा कर डोक्यावर वाढत जातो. अशा वेळी संबंधित बँकेकडून पुरवण्यात आलेल्या ऑटो पे सुविधेचा लाभ घेता येतो. या सुविधेसाठी खातेदाराने खात्यात रक्कम आधीच जमा ठेवणे आवश्यक असते.
जर आधीच डोक्यावर जास्त कर्ज झाले असेल तर…
- महिन्याची Minimum Due भरण्यापेक्षा शक्य तितकी जास्त रक्कम भरणे कधीही उत्तम पर्याय ठरेल. कर्जाची रक्कम जितकी कमी होईल तितकी त्यावर व्याजामुळे होणारी वाढही कमी करता येईल.
- Snowball Method : या पद्धतीत एकापेक्षा जास्त कर्ज असेल तर सगळ्यात अगोदर कमी रक्कमेचे कर्ज टप्प्याटप्प्याने फेडावे. एक कर्ज फिटले तर पुढचे कमी रक्कमेचे कर्ज टप्प्याटप्प्याने फेडावे.
सरकारच्या विशेष बचत योजना! महिन्याला 2000 जमा कराल तर होईल लाखोंचा नफा, समजून घ्या पूर्ण गणित
- Avalanche Method : वाढत्या व्याजाचा खर्च कमी करायचा असल्यास सगळ्यात अगोदर ते कर्ज फेडण्यास घ्या ज्याचे व्याजदर जास्त आहे. शक्य तितकी रक्कम टप्प्याटप्प्याने पेमेंट करून सर्व कर्ज फेडून घ्या.
क्रेडिट कार्ड ही अतिरिक्त उत्पन्न किंवा बँकेकडून पुरवण्यात आलेली मदत नाही. क्रेडिट कार्ड तेव्हाच वापरा जेव्हा त्यातून होणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा कमी असेल.

