Washim Farmer Dies after Swimming in Well : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम केल्यानंतर विहिरीत पोहायला गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्यानं कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

रमेश आंधळे बराच वेळ झाल्यानंतरही ते विहिरीतून बाहेर न आल्यानं शेतातील इतर मजुरांनी विहिरीत पाहिले असता रमेश आंधळे यांचा मृतदेह दिसला. विहिरीत पाणी जास्त असल्याने सामान्य नागरिकांना त्यांचा मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करून ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Crime News: तू खूप क्यूट आहेस, घरी सांग उशिरा येते, फिरायला जाऊ; चौथीतील मुलीला स्कूल बसमध्ये अश्लील स्पर्श, 30 वर्षीय चालकावर गुन्हा
मृतक रमेश आंधळे यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसऱ्यांच्या शेतात ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार गमावला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी एक भीषण अपघात घडला होता. शहरातील दारव्हा येथे भीषण अपघात झाला होता. भरधाव बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दारव्हा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळ ही घटना घडली होती.
चार तासांचा प्रवास फक्त सव्वा तासांत; समृद्धी महामार्ग-वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी

