Washim Gondegaon 4 Year Old Swaraj Dies After Falling Into Drain; आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत
Washim Gondegaon 4 Year Old Swaraj Dies After Falling Into Drain; आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत
Washim Child Dies After Falling into Drain : वाशिम जिल्ह्यातील गोंडेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आळी आहे. मामाच्या गावाला गेलेल्या 4 वर्षीय स्वराजचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.
वाशिम गोंडेगाव नाल्यात पडून मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील गोंडेगाव परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली असून आईसोबत मामाच्या गावाला गेलेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Washim Child Dies After Falling into Drain)
वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. गोंडेगावातही जोरदार पाऊस पडल्याने गावातील नाले तुडूंब भरून वाहत होते. हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावातील स्वराज आपल्या आईसोबत गोंडेगाव येथे मामाकडे आला होता. सकाळच्यावेळी त्याच्या आईने अंगणात त्याला अंघोळ घातली आणि आई घरात गेली तेवढ्यात स्वराज अशोक खिल्लारे हा 4 वर्षीय चिमुकला नालीत पडला आणि काही अंतरावर वाहून गेला, त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्वराज अंगणात दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्याचा शोध लागला नाही. ज्या नालीत तो वाहून गेला त्या नालीवर रापटा नसल्याने तो नालीत वाहून गेला असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरील नाली जेसीबीच्या साहाय्याने खोदून नाल्यातील मोठा पाईप बाजूला काढला असता त्याचा मृतदेह वाहून बाहेर आला. स्वराज नाल्यात पडला आणि पुढे जाऊन पाईपात अडकला त्यामुळे श्वास घेता न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून यासाठी दोषी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी मृत स्वराज खिल्लारेच्या कुटुंबियांनी केली आहे.
स्वराजच्या वडिलांनी मुंबईवरून मोटारसायकलनं गाठलं गाव
स्वराजचे वडील मुंबईमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वराज मामाकडे आलेला असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळली. घटना घडण्याच्या वेळेत मुंबईवरून वाशिमकडे येण्यासाठी ट्रेन किंवा बस नव्हती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मुंबई वरून 600 कि.मी मीटरचा प्रवास दुचाकीवरून करून गाव गाठलं. लेकाला मृतावस्थेत बघून बापाने एकच आक्रोश केला. त्यानंतर स्वराजवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा