Headlines

Washim Devanshi Liver Transplant Surgery was Successful his Mother Donated his Liver; चिमुकल्या देवांशीवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, आईने वाचविले मुलीचे प्राण


मुंबई : सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजारासोबत झटत होती. डॉक्टरांनी अखेर ‘यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. तसेच उपचारासाठी सुमारे 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचंही सांगितलं. मात्र, भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता. या कठीण काळात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला. तर, देवांशीच्या आईने तिला यकृताचा भाग देवून तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड (बु) येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती. पालकांनी सुरूवातीला मंहरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले. परंतू तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं अखेर तिला नागपूर येथे हलविण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचं यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचं निदान केलं. तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गरजेचं असल्याचं सांगितलं.

Maharashtra Timesफेसबुकवर महिलेशी केली ओळख, नंतर घरी जाऊन अत्याचार; पोलिसांनी नराधमाच्या मुस्क्या आवळल्या!

शस्त्रक्रियेसाठी सुमारे 20 लाख रुपये खर्चाचा अंदाज त्यांनी वर्तविला होता. दरम्यान, देवांशीच्या वडिलांना मित्रांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर रवींद्र गावंडे यांनी तात्काळ कक्षाशी संपर्क साधला, तसेच सोशल मीडियावर मदतीकरिता आवाहन केलं. कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी राहिली. उर्वरीत रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली. पुढे, देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृताचा भाग दिला. त्यातून तिच्यावर 7 जुलै 2025 रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रियापार पडली.

‘देवांशीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले’, असं रविंद्र गावंडे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Timesएकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोठ्या घडामोडी, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यात खल, भाजपचं काय ठरतंय?

दरम्यान, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. देवांशी त्याचं एक उदाहरण आहे. आम्ही वेळेवर मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे’, असं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी म्हटलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत