Headlines

Virar Bolinj Woman Prachi Patil Dies after Father in law pushes her off Crime News; माझं बाळ द्या… सुनेनं लेकीला खेचलं, सासऱ्यांनी जोरात ढकललं, 28 वर्षांच्या प्राचीचा हृदयद्रावक अंत


Virar Woman Prachi Patil Death : बाळावरुन खेचाखेची सुरु असताना गणपत पाटील यांनी प्राचीला जोरदार धक्का दिला, त्यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली

Virar Prachi Patil Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विरार : आठ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरुन झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले. झटापटीत सासऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे खाली कोसळून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. विरारमधील नारंगी गावात गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. बोळींज पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने आठ महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हरपले आहे.

सासरच्या मंडळींशी वारंवार खटके

प्राची कल्पेश पाटील असे २८ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. ती विरारजवळील नारंगी गावातील भगत आळी येथे आपल्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती. पती आणि सासरच्या इतर सदस्यांशी तिचे वारंवार खटके उडत असत, असे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी झालेल्या कौटुंबिक वादात प्राचीला शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे. हे समजताच प्राचीचा भाऊ विशाल पाटील (३३) गुरुवारी सकाळी तिला माहेरी नेण्यासाठी तिच्या घरी आला होता. ती निघण्याची तयारी करत असतानाच, तिचे सासरे गणपत पाटील यांनी तिच्या आठ महिन्यांच्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले, त्यामुळे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
Maharashtra TimesCrime News : पती ऑस्ट्रेलियात, बोलायलाही वेळ नसतो; सुनेने दोन वर्ष कुटुंबाला गंडवलं, शेवटी ‘दृश्यम’ स्टाईल उलगडा, 12 फूट खोदकाम

बाळावरुन सासरे-सुनेत खेचाखेची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाचे रुपांतर झटापटीत झाले. बाळावरुन खेचाखेची सुरु असताना गणपत पाटील यांनी प्राचीला जोरदार धक्का दिला. यामुळे तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली; यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra Weather Alert: 3 विभागात अतिवृष्टीचा इशारा, 30-31 July 2026 साठी IMD Issues High Alert

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सासरे गणपत पाटील यांना अटक केली. प्राचीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

तरुणाचा निर्घृण खून

दुसरीकडे, एका पस्तीस वर्षीय अज्ञात तरुणाचा खून करुन मृतदेह सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोकरदन रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ आणून टाकला. ही घटना बुधवारी (२९ जुलै) दुपारी उघडकीस आली. या अज्ञात तरुणाच्या खुनाच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra TimesNagpur Crime : क्रिकेट संघात निवड होत नसल्याने तणावात, युवा महिला क्रिकेटपटूने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हळहळला
एका व्यक्तीने ११२ नंबरवर कॉल करून सिल्लोड- भोकरदन रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ मृतदेह पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता एक ३०- ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. मृत तरुणाचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला असल्याचे दिसून आले. घटनास्थळी एक कटर सापडल्याने खून झाल्याचे निष्पन्न झाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा